एफआयएच प्रो लीग २०२५-२६: रोमांचक मुकाबल्यात भारताची कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर मात
लंडन, 24 जून (हिं.स.) भारतीय हॉकी संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून एफआयएच प्रो लीग २०२५-२६ च्या लंडन फेरीची सुरुवात केली. ली व्हॅली हॉकी आणि टेनिस सेंटर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ४-३ असा रोमांचक विजय मिळवला. पुरुष
भारतीय हॉकी संघ


लंडन, 24 जून (हिं.स.) भारतीय हॉकी संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून एफआयएच प्रो लीग २०२५-२६ च्या लंडन फेरीची सुरुवात केली. ली व्हॅली हॉकी आणि टेनिस सेंटर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ४-३ असा रोमांचक विजय मिळवला.

पुरुष हॉकी क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या भारताकडून अभिषेक (२२ व्या मिनिटाला), नीलकंठ शर्मा (२४ व्या मिनिटाला), सुखजीत सिंग (४० व्या मिनिटाला) आणि राजिंदर सिंग (५२ व्या मिनिटाला) यांनी गोल केले. जगात १२ व्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानकडून अहमद नदीम (८ व्या मिनिटाला), अबू महमूद (५३ व्या मिनिटाला) आणि मोईन शकील (६० व्या मिनिटाला) यांनी गोल केले. भारताच्या मनप्रीत सिंगला सामनावीर पुरस्कार मिळाला.

सामन्याच्या आठव्या मिनिटाला अहमद नदीमने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून पाकिस्तानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने खेळाचा वेग वाढवला आणि २२व्या मिनिटाला बरोबरी साधली. दिलप्रीत सिंगचा जोरदार शॉट गोलकीपर मुनीब उर रहमान रझाने अडवला, पण अभिषेकने आक्रमक बचाव करत रिबाउंडवर गोल करून स्कोअर १-१ असा बरोबर केला. तीन मिनिटांनंतर, भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. नीलाकांत शर्माने सर्वात आधी चेंडूचा ताबा मिळवून गोल केला आणि भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

भारताने ४० व्या मिनिटाला आणखी एक गोल केला. अभिषेकने सर्कलच्या आत सुखजीत सिंगला एक अप्रतिम पास दिला, ज्यावर सुखजीतने उत्कृष्ट फिनिशिंग करत आपल्या संघाला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. पाकिस्तानने गोलमधील अंतर कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण भारतीय बचावफळीने ५१ व्या मिनिटाला सलग दोन पेनल्टी कॉर्नर वाचवले. त्यानंतर भारतीय स्ट्रायकर्सनी प्रतिहल्ला केला आणि एका मिनिटानंतर पेनल्टी कॉर्नर मिळवला. राजिंदरने बदली गोलकीपर वकारला चकवून गोल केला आणि स्कोअर ४-१ असा केला.

पाकिस्तानने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि कर्णधार अबू महमूदने पेनल्टी कॉर्नरवर भारतीय गोलकीपर सूरज करकेराला चकवून गोल केला, ज्यामुळे स्कोअर ४-२ असा झाला. खेळ संपायला केवळ १४ सेकंद शिल्लक असताना, पाकिस्तानच्या मोईन शकीलने पेनल्टी कॉर्नरच्या रिबाउंडवर गोल करून स्कोअर ४-३ असा केला. पण, भारताने शेवटपर्यंत संयम राखला आणि अटीतटीच्या लढतीनंतर विजय मिळवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande