सिल्लोड–सोयगावच्या जलसंधारणाच्या विकासासाठी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 25 जून, (हिं.स.)। सिल्लोड–सोयगावच्या जलसंधारणाच्या विकासासाठी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक आमदार अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्री संजय राठोड यांची झाली. मुंबई येथील शिवनेरी बंगल्यावर महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय
Q


छत्रपती संभाजीनगर, 25 जून, (हिं.स.)। सिल्लोड–सोयगावच्या जलसंधारणाच्या विकासासाठी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक आमदार अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्री संजय राठोड यांची झाली.

मुंबई येथील शिवनेरी बंगल्यावर महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची भेट घेऊन सिल्लोड–सोयगाव मतदारसंघातील सिमेंट नाला बंधारे, खोलीकरणाची कामे तसेच विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.

मतदारसंघातील जलसंधारण व विकासकामांना गती देण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली असून यावेळी सदरील विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्री संजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande