आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रवीण जेठेवाड
नांदेड, 25 जून (हिं.स.)। आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या स्थापनेनंतर संघटनेचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल प्रवीण जेठेवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस संतोष वारकड, राष्ट्रीय चिटणीस राजेश्वर पालेपवाड, राष्ट
आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रवीण जेठेवाड


नांदेड, 25 जून (हिं.स.)।

आदिवासी मन्नेरवारलू महासंघाच्या स्थापनेनंतर संघटनेचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल प्रवीण जेठेवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस संतोष वारकड, राष्ट्रीय चिटणीस राजेश्वर पालेपवाड, राष्ट्रीय कोषाध्यक्ष गंगाधरराव रामोड आणि राष्ट्रीय संचालक गणेश सुभानजोड उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना प्रवीण जेठेवाड यांनी आदिवासी, दलित, वंचित व उपेक्षित समाजघटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. रोजगार, कौशल्य विकास व स्वावलंबनासाठी महासंघामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आदिवासी मन्नेरवारलू महासंघाला केंद्र सरकारकडून अधिकृत नोंदणी व मान्यता प्राप्त झाली असून, आता ही संघटना राष्ट्रीय स्तरावर समाजहितासाठी कार्य करणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांसाठी संघटितपणे लढा देत समाजाच्या विविध घटकांच्या न्याय्य

हक्कांसाठी महासंघ कार्यरत राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रवीण जेठेवाड (राष्ट्रीय अध्यक्ष), रामरेड्डी आईटवार (राष्ट्रीय उपाध्यक्ष), संतोष वारकड (राष्ट्रीय सरचिटणीस), राजेश्वर पालेपवाड (राष्ट्रीय चिटणीस), गंगाधरराव रामोड (राष्ट्रीय कोषाध्यक्ष), गणेश सुभानजोड (राष्ट्रीय संचालक) व तुकाराम आडबलवार (मुख्य कार्यकारी अधिकारी व राष्ट्रीय संचालक) यांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande