मी कोणाच्याही दारात गेले नाही; विचारधारेशी तडजोड करणार नाही – नवनीत राणा
अमरावती, 26 जून, (हिं.स.) - अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात राज्यसभा उमेदवारी आणि आगामी राजकीय वाटचालीवर भाष्य करताना माजी खासदार नवनीत राणा यांनी आपण कोणाच्याही दारात पदासाठी गेलो नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेसाठी आपल्याला संधी मिळावी अशी इच्छा ह
मी कोणाच्याही दारात गेले नाही; विचारधारेशी तडजोड करणार नाही – नवनीत राणा


अमरावती, 26 जून, (हिं.स.) - अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात राज्यसभा उमेदवारी आणि आगामी राजकीय वाटचालीवर भाष्य करताना माजी खासदार नवनीत राणा यांनी आपण कोणाच्याही दारात पदासाठी गेलो नसल्याचे स्पष्ट केले. राज्यसभेसाठी आपल्याला संधी मिळावी अशी इच्छा होती आणि त्यासाठी सुनेत्रा पवार तसेच देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही तिकीटासाठी मी कोणाच्याही दारात गेले नव्हते, असे त्या म्हणाल्या.

पदे येतात-जातात, मात्र आपल्या विचारधारेशी तडजोड करणार नसून शेवटच्या श्वासापर्यंत त्यासाठी लढत राहणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण पूर्ण तयारीत असून मैदानात उतरल्याचेही त्यांनी जाहीर केले. खासदार असताना अनेक विद्यार्थ्यांना संसद भवनाची भेट घडवून आणल्याची आठवण करून देत, सध्या ते शक्य नसल्याची खंत व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande