जुरेलच्या शतकाने भारत-अ संघ मजबूत स्थितीत
कोलंबो, 26 जून (हिं.स.)। श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारत-अ संघाने गाले येथे सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी करत यजमान श्रीलंका-अ संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. सलामीवीर साई सुदर्शनच्या शानदार शतकानंतर कर्णधार ध्
Jurel Century Puts India A Strong Position


कोलंबो, 26 जून (हिं.स.)। श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारत-अ संघाने गाले येथे सुरू असलेल्या पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्यात दमदार फलंदाजी करत यजमान श्रीलंका-अ संघाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. सलामीवीर साई सुदर्शनच्या शानदार शतकानंतर कर्णधार ध्रुव जुरेलनेही संयमी आणि तितकीच आक्रमक खेळी साकारत शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीमुळे भारत-अ संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली असून दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रअखेर संघाने पाच गडी गमावून ४52 धावांचा भक्कम डोंगर उभारला आहे. ध्रुव जुरेल २15 चेंडूत १4१ धावांवर नाबाद असून त्याला हर्ष दुबे ५1 चेंडूत ३0 धावांवर साथ देत आहे.

पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या ध्रुव जुरेलसमोर सुरुवातीला आव्हानात्मक परिस्थिती होती. देवदत्त पडिक्कल आणि ऋतुराज गायकवाड झटपट बाद झाल्यानंतर त्याने डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. सुरुवातीला संयमाने फलंदाजी करत त्याने एकेक धाव जमा केली. १८१ चेंडूंमध्ये त्याने आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने नऊ चौकार लगावले. शतक पूर्ण झाल्यानंतर मात्र त्याने आपल्या खेळीचा वेग वाढवत श्रीलंकेच्या गोलंदाजांवर आक्रमण चढवले.

ध्रुव जुरेलच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीतील हे सहावे शतक ठरले. आतापर्यंत ३४ प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने ५२.९५ च्या सरासरीने २,३३० धावा केल्या आहेत. यापूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया-अ आणि दक्षिण आफ्रिका-अ संघांविरुद्धही शतकी खेळी केली होती. आता श्रीलंका-अ विरुद्धही शतक झळकावत त्याने कठीण परिस्थितीत संघाला सावरण्याची आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

साई सुदर्शन बाद झाल्यानंतर ध्रुव जुरेलला तरुण फलंदाज शेख रशीदची मोलाची साथ मिळाली. चौथी विकेट २१७ धावांवर पडल्यानंतर या दोघांनी पाचव्या विकेटसाठी २३२ चेंडूंमध्ये १३६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. या भागीदारीमुळे श्रीलंका-अ संघाच्या गोलंदाजांना विकेटसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. शेख रशीदने ११३ चेंडूंचा सामना करत पाच चौकारांच्या मदतीने ६३ धावांची संयमी आणि उपयुक्त खेळी साकारत कर्णधाराला उत्तम साथ दिली.

यापूर्वी डावाची भक्कम पायाभरणी सलामीवीर साई सुदर्शनने केली होती. त्याने अवघ्या १७५ चेंडूंमध्ये १३२ धावांची शानदार खेळी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सुदर्शनने आयुष पांडेसोबत पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाडसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी उभारली. पुढे ध्रुव जुरेलसोबत चौथ्या विकेटसाठी ३५ धावा जोडत त्याने भारत-अ संघाच्या मोठ्या धावसंख्येचा मजबूत पाया रचला. सुदर्शन, जुरेल आणि रशीद यांच्या प्रभावी खेळीमुळे भारत-अ संघ सध्या सामन्यात पूर्णपणे वरचढ स्थितीत दिसून आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande