स्मिता कवडे, विजय जाधव, महादेव गोठणकर छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार जाहीर
मुंबई, 26 जून (हिं.स.) - सामाजिक न्याय, समता आणि बंधुभावपूर्ण समाजनिर्मितीसाठी सातत्याने कार्य करणारे श्रीमती स्मिता कवडे, श्री विजय जाधव व श्री महादेव गोठणकर यांना कोंकण विभागातून “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” जाहीर झ
स्मिता कवडे, विजय जाधव, महादेव गोठणकर छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार जाहीर


मुंबई, 26 जून (हिं.स.) -

सामाजिक न्याय, समता आणि बंधुभावपूर्ण समाजनिर्मितीसाठी सातत्याने कार्य करणारे श्रीमती स्मिता कवडे, श्री विजय जाधव व श्री महादेव गोठणकर यांना कोंकण विभागातून “छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार २०२६” जाहीर झाला आहे.

विवेक विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे व राज्यातील विविध सामाजिक सहयोगी संस्थांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२६ मध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक परिवर्तन, संविधानिक मूल्यांचा प्रसार आणि समाजातील वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी या कार्यकर्त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा हा गौरव आहे.

हा पुरस्कार रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, डॉ. शरणकुमार लिंबाळे व पद्मश्री दादा इदाते या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande