माणगाव तालुका प्रेस क्लबतर्फे पत्रकार अवमानाचा निषेध
खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्यावर कारवाईची मागणी रायगड, 26 जून (हिं.स.) : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा अवमान करणारी कोणतीही वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका माणगाव तालुका प्रेस क्लबने घेतली आहे. याच पार्श्वभ
Uphold the dignity of journalists; Mangaon Press Club issues a warning.


खासदार संजय दिना पाटील यांच्या कथित वक्तव्यावर कारवाईची मागणी

रायगड, 26 जून (हिं.स.) : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा अवमान करणारी कोणतीही वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका माणगाव तालुका प्रेस क्लबने घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रेस क्लबच्या वतीने माणगाव पोलीस ठाण्यात निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रेस क्लबने नमूद केले आहे की, पत्रकार समाजहित, लोकहित आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी सातत्याने कार्यरत असतात. शासन, प्रशासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांविषयी अवमानकारक भाषा वापरणे, धमकीची भावना निर्माण करणे किंवा प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या वेळी माणगाव तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष सुतार, कार्याध्यक्ष गौतम जाधव, उपाध्यक्ष विश्वास गायकवाड, सल्लागार विनोद सापळे, उत्तम तांबे आणि मुख्य संघटक पद्माकर उभारे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रेस क्लबने इशारा दिला आहे की पत्रकारांचा सन्मान आणि स्वाभिमान अबाधित राखण्यासाठी आवश्यक ते सर्व कायदेशीर मार्ग अवलंबले जातील.

-------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande