
नवी दिल्ली, 26 जून (हिं.स.) - उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 27 व 28 जून 2026 रोजी कर्नाटकचा दोन दिवसांचा दौरा करणार आहेत.
27 जून 2026 रोजी उपराष्ट्रपती बंगळुरू येथे नादप्रभू श्री केंपेगौडा यांच्या 517व्या जयंती सोहळ्यामध्ये सहभागी होतील.
28 जून 2026 रोजी उपराष्ट्रपती बंगळुरू येथे राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापना दिनाचा एक भाग म्हणून आयोजित 'नशा मुक्त भारत परिसंवादात’ तसेच 'आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ आणि अवैध तस्करी विरोधी दिन' कार्यक्रमातही सहभागी होतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी