
बीड, 04 जून (हिं.स.)।
जमिनीच्या जुन्या वादातून एका ७५ वर्षीय वृद्धेला रबरी पाईपने बेदम मारहाण करत बळजबरीने तोंडात विषारी औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना फुलेपिंपळगाव येथे घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
वृद्ध शशिकला कोरडे या घरासमोर नळाचे पाणी भरण्यासाठी रबरी पाईप हातात घेऊन उभा होत्या. त्याचवेळी गावातीलच त्यांचा पुतण्या आले. त्यांनी जागेच्या जुन्या वादावरून यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपी याने त्यांच्या हातातील पाईप हिसकावून घेऊन त्यांना बेदम मारहाण केली, चापटबुक्क्यांनी मारत तिच्या जवळील चुन्याच्या डबीसारख्या डबीतील विषारी औषध वृद्धेच्या तोंडात कोंडले. या प्राणघेण्या हल्ल्यानंतर जागेवरच बेशुद्ध पडल्या. भांडणाचा आवाज ऐकून त्यांचा नातू याने धाव घेत नातेवाईकांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांना तातडीने लेंडाळ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले.
या धक्कादायक घटनेप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप नारायण राठोड करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis