
छत्रपती संभाजीनगर, 04 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 4 जुलै रोजी होत आहे. या निवडणुकीत आज बिगरशेती मतदारसंघातून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावे तर प्राथमिक कृषी पतपुरवठा मतदारसंघातून अभिजीत देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपत सहकार क्षेत्राच्या विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा आपला संकल्प आहे, असे मंत्री सावे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis