मालवाहतूक भाड्यात 30 टक्के वाढ; 1 जूनपासून नवे दर लागू
पुणे, 04 जून (हिं.स.)। इंधन दरवाढ, वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढत्या किंमती आणि वाहतूक व्यवसायावरील वाढता आर्थिक भार यामुळे मालवाहतूक भाड्यात 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय दि पुणा डिस्ट्रिक्ट मोटर गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने घेतला आहे. या संदर्भ
मालवाहतूक भाड्यात 30 टक्के वाढ; 1 जूनपासून नवे दर लागू


पुणे, 04 जून (हिं.स.)। इंधन दरवाढ, वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढत्या किंमती आणि वाहतूक व्यवसायावरील वाढता आर्थिक भार यामुळे मालवाहतूक भाड्यात 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय दि पुणा डिस्ट्रिक्ट मोटर गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने घेतला आहे. या संदर्भातील परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले असून ही दरवाढ 1 जून 2026 पासून लागू करण्यात आली आहे.

असोसिएशनचे सचिव राजेंद्रसिंह रजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयामार्फत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर वाहनांच्या देखभालीसाठी लागणारे स्पेअर पार्ट्स, टायर आणि इतर आवश्यक साहित्याच्या किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मालवाहतूक व्यवसाय चालविणे अधिक खर्चिक बनले असून वाहनचालक आणि मालकांवर आर्थिक ताण वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर असोसिएशनच्या 24 मे 2026 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांनी एकमताने मालवाहतूक भाड्यात 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय टिकवण्यासाठी आणि वाढत्या खर्चाचा भार काही प्रमाणात कमी करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

मालवाहतूक भाड्यातील या वाढीचा परिणाम विविध वस्तूंच्या वाहतूक खर्चावर होण्याची शक्यता असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम बाजारातील वस्तूंच्या किंमतींवरही जाणवू शकतो. दरम्यान, या निर्णयाला वाहतूक क्षेत्रातील अनेक वाहनचालक आणि मालकांनी पाठिंबा दर्शविला असल्याची माहिती असोसिएशनकडून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande