परभणी - दुकानांसमोर डस्टबिन अनिवार्य; नियमभंग करणा-यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा
परभणी, 04 जून (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील व्यापारी, दुकानदार, फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर अनिवार्यपणे डस्टबिन ठेवावे तसेच घरातील ओला व सुका कचरा घंटागाडीत टाकावा, असे निर्देश देण्या
परभणी - दुकानांसमोर डस्टबिन अनिवार्य; नियमभंग करणा-यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा


परभणी, 04 जून (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहरातील व्यापारी, दुकानदार, फळविक्रेते व भाजी विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर अनिवार्यपणे डस्टबिन ठेवावे तसेच घरातील ओला व सुका कचरा घंटागाडीत टाकावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे की, शहरातील काही व्यापारी, दुकानदार तसेच फळ व भाजी विक्रेते डस्टबिन न ठेवता रस्त्यावर कचरा टाकत आहेत. या प्रकारामुळे शहराच्या स्वच्छतेवर विपरीत परिणाम होत असून अशा दुकानदार व विक्रेत्यांवर घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात स्वच्छता निरीक्षक व मुकादाम यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील व्यापारी, दुकानदार, फळ विक्रेते व भाजी विक्रेते यांच्याकडे डस्टबिन नसल्यास तसेच रस्त्यावर कचरा टाकताना आढळल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आपल्या परिसरात अथवा घरासमोर कोणीही रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीचा फोटो काढून तो संबंधित प्रभाग समितीच्या स्वच्छता विभागाकडे पाठवावा, असे महानगरपालिकेने म्हटले आहे.शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्व नागरिक, व्यापारी आणि विक्रेत्यांनी महानगरपालिकेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महापौर सय्यद इकबाल यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande