लातूर - स्थानिक प्राधिकारी निवडणुकीसाठी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश
लातूर, 04 जून (हिं.स.)। उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणूक २०२६ साठी प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात पार पडेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक मि
स्थानिक स्वराज्य संस्था


लातूर, 04 जून (हिं.स.)। उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक विधान परिषद निवडणूक २०२६ साठी प्रशासन सज्ज झाले असून निवडणूक निर्भय, नि:पक्षपणे व मुक्त वातावरणात पार पडेल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक मिलिंद बोरकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक रितू खोखर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग, मतदान साहित्य वितरण, सीलबंद मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हीलचेअर सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच आचारसंहितेच्या अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये, तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी आणि सर्व मतदान पथकांना योग्य प्रशिक्षण द्यावे, असेही सांगण्यात आले.

या निवडणुकीत जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींचे मिळून एकूण ९८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान १८ जून रोजी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande