स्वच्छतागृहे, पाणी, वीज सुविधांची तपासणी; सोलापूर जि. परिषद शाळांचा आदर्श उपक्रम
सोलापूर, 04 जून (हिं.स.)। जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाची पाहणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीने सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक शाळांना भेटी दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आ
ZP news solpaur


सोलापूर, 04 जून (हिं.स.)। जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाची पाहणी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीने सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक शाळांना भेटी दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मे 2026 अखेरपर्यंत समितीने जिल्ह्यातील 54 शाळांची पाहणी केली असून ही संख्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुमोटो जनहित याचिका क्रमांक 01/2018 मध्ये दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हा परिषद शाळांमधील उपलब्ध सुविधा, पायाभूत व्यवस्था आणि शैक्षणिक वातावरणाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांकडून नियमित शाळा भेटी घेऊन त्यांचे अहवाल शासनाकडे सादर केले जात आहेत.अहवालानुसार सोलापूरनंतर ठाणे जिल्ह्यात 43, नंदुरबारमध्ये 40, नाशिकमध्ये 34 तर पुणे आणि चंद्रपूर जिल्ह्यांत प्रत्येकी 26 शाळांची पाहणी करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात एप्रिल 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत सातत्याने शाळा भेटी घेण्यात आल्या. मार्च 2026 महिन्यात सर्वाधिक आठ शाळांची पाहणी करण्यात आली होती. या भेटीदरम्यान शाळांच्या इमारतींची स्थिती, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीजपुरवठा, वर्गखोल्या तसेच इतर मूलभूत सुविधांची तपासणी करण्यात आली.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध आहेत का, याची खातरजमा करण्यासाठी शासनाने या पाहणी मोहिमेचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय समितीने सोलापूर जिल्ह्यात व्यापक तपासणी मोहीम राबविली.याबाबत शिक्षणाधिकारी

कादर शेख

यांनी सांगितले की, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूरमध्ये सर्वाधिक शाळांची पाहणी करण्यात आल्यामुळे जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. शाळांमधील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी ही प्रक्रिया पुढेही सुरू राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande