अमरावतीत ढगफुटीसदृश पाऊस; 1 मृत, 1 बेपत्ता!:करजगाव, शिरजगावात 83 मिमी पावसाची नोंद, चारगड नाल्याला पूर
अमरावती, 01 जुलै (हिं.स.) चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा लगतच्या पांढरी गावातील दोन शेतकरी चारगड नाल्यावरील पुलावरून जात असताना पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतील एका शेतकऱ्
ढगफुटीसदृश पाऊस; 1 मृत, 1 बेपत्ता!:करजगाव, शिरजगावात 83 मिमी पावसाची नोंद, चारगड नाल्याला पूर आल्याने घडली घटना


अमरावती, 01 जुलै (हिं.स.)

चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा लगतच्या पांढरी गावातील दोन शेतकरी चारगड नाल्यावरील पुलावरून जात असताना पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेतील एका शेतकऱ्याचा मृतदेह सकाळी सापडला असून,दुसऱ्या शेतकऱ्याचा शोध सुरू आहे. मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वत राजीत झालेल्या मुसळधार पावसामुळे मेघा नदीसह परिसरातील नदी,नाले दुथडी भरून वाहत असल्याने ही घटना घडली आहे.

रवींद्र रामभाऊ आवारे (वय ५५) असे मृतशेतकऱ्याचे, तर गोपाल निर्वार असे बेपत्ता असलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हे दोघेही पांढरी गावातीलरहीवासी आहेत. गोपाल निर्वार आणि रवींद्र आवारे हे सायंकाळी काही कामानिमीत्त गावातूनशिरजगाव कसबा येथे आले होते. दरम्यान रात्री सुमारेदहा वाजताच्या सुमारास शिरसगाव कसबा येथून पायीमूळ गावी पांढरीकडे निघाले होते. शिरजगाव ते पांढरी मार्गावरील चारगड नाल्याला मुसळधार पावसामुळेमोठा पूर आला होता. पुराच्या पाण्याचा अंदाज नआल्याने पुल ओलांडताना दोघेही वेगवान प्रवाहातवाहून गेले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande