
छत्रपती संभाजीनगर, 01 जुलै (हिं.स.)।
हरित क्रांतीचे जनक, वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले
वसंतराव नाईक हे हरित क्रांतीचे जनक असून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी शेती आणि सिंचनाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणले. त्यांनी प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री म्हणून सेवा बजावत महाराष्ट्राच्या विकासाचा पाया रचला. असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी डॉ.संभाजी अडकूणे यांनी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले.त्यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संगीता राठोड उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, त्यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis