बारमाही पाण्याने फुलला मेळघाट; ११८ बंधाऱ्यांचा सकारात्मक परिणाम
अमरावती, 01 जुलै (हिं.स.) चिखलदरा तालुक्यात पावसाचे पाणी डोंगर उतारावरून वाहून जात असल्याने तहानलेली राहणारी चिखलदरा तालुक्यातील शेती आज ग्याबियन बंधारे आणि सिमेंट नाला बांधांमुळे हिरवीगार होत आहे. सन २०२४ ते २०२६ या दोन वर्षात जिल्हा परिषद लघु जल
बारमाही पाण्याने फुलला मेळघाट;  ११८ बंधाऱ्यांचा सकारात्मक परिणाम


अमरावती, 01 जुलै (हिं.स.)

चिखलदरा तालुक्यात पावसाचे पाणी डोंगर उतारावरून वाहून जात असल्याने तहानलेली राहणारी चिखलदरा तालुक्यातील शेती आज ग्याबियन बंधारे आणि सिमेंट नाला बांधांमुळे हिरवीगार होत आहे. सन २०२४ ते २०२६ या दोन वर्षात जिल्हा परिषद लघु जलसिंचन विभागाने उभारलेल्या ११८ बंधाऱ्यांनी मेळघाटातील शेकडो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण केला आहे. या बंधाऱ्यांमुळे सुमारे २०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून गहू, हरभरा आणि इतर रब्बी पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यासोबतच स्थानिक मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागला आहे. भांडोरा, कालापांढरी, कारदा, बामादही, पाचडोंगरी, आवागड आणि राजनिकुंड या गावांमध्ये जिथे पूर्वी सिंचनाची कोणतीही व्यवस्था नव्हती, तिथे आज शेतात पाणी पोहोचत आहे. अनेक वर्षांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे.राजनिकुंड येथील शेतकरी किरण पोकडे म्हणाले, माझ्या शेतात ग्याबियन बंधारा झाल्यामुळे दोन एकर क्षेत्राला सिंचनाची सुविधा मिळाली. आज मी गहू आणि हरभऱ्याचे भरघोस उत्पादन घेत आहे. हा बंधारा आमच्यासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरला आहे.सिमेंट नाला बांधामुळे पाणी अडले, जमिनीत मुरले आणि शेतीला जीवदान मिळाले. याचा फायदा फक्त शेतकऱ्यांनाच नाही, तर जंगलातील वन्यप्राणी आणि गावातील पाळीव जनावरांनाही होत आहे. - अशोक अलोकार उपसरपंच, राजनिकुंड.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande