निमाच्या एचएएल व्हेंडर डेव्हलपमेंट मीटमुळे मिळणार आत्मनिर्भर भारत मिशनला बळ
विमान निर्मितीसाठी सुमारे ३०० उद्योजकांना नवीन उत्पादन उद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी नाशिक, 11 जुलै (हिं.स.)। : देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ देण्यासाठी आणि स्थानिक एमएसएमई उद्योगांना संरक्षण उत्पादन साखळीशी जोडण्याच्
NIMA's HAL Vendor Development


NIMA's HAL Vendor Development


विमान निर्मितीसाठी सुमारे ३०० उद्योजकांना नवीन उत्पादन उद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी

नाशिक, 11 जुलै (हिं.स.)।

: देशाच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारत अभियानाला बळ देण्यासाठी आणि स्थानिक एमएसएमई उद्योगांना संरक्षण उत्पादन साखळीशी जोडण्याच्या उद्देशाने निमा (NIMA) आयोजित एचएएल व्हेंडर डेव्हलपमेंट मीट – २०२६ ला उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दोन दिवसीय उपक्रमात सुमारे ३०० उद्योजकांना हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) साठी आवश्यक विमान व एरोस्पेस घटकांच्या उत्पादनासाठी नवीन उद्योग सुरू करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे समारोपप्रसंगी निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले.

एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमान निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विविध घटक, उपघटक, मशिनिंग, फॅब्रिकेशन, टूलिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्पोझिट्स आणि इतर उत्पादनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच व्हेंडर नोंदणी प्रक्रिया, गुणवत्ता निकष, प्रमाणपत्रे, तांत्रिक अपेक्षा आणि व्यवसाय संधी याबाबत उद्योजकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्रांतिक आपसी सखोल चर्चेद्वारे सदर कार्यशाळा संपन्न झाली.

यावेळी उद्योजकांनी एचएएलच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले. अनेक उद्योगांनी एचएएलच्या पुरवठा साखळीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी एच ए एल ने त्यांना लागण्याऱ्या सुट्या भागांचे प्रदर्शन निमामधे लावले होते.

निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले की, “नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांसाठी संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रातील व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे अनेक उद्योजक नवीन उत्पादन सुविधा उभारून एचएएलसारख्या देशातील अग्रगण्य संरक्षण संस्थेचे अधिकृत पुरवठादार बनू शकतील. यामुळे रोजगारनिर्मिती, तंत्रज्ञान विकास आणि प्रदेशाच्या औद्योगिक प्रगतीला मोठी चालना मिळेल.”

या कार्यक्रमाला नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील एमएसएमई, अभियांत्रिकी उद्योग, स्टार्टअप्स आणि उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संरक्षण उत्पादन क्षेत्रात नाशिकला एक महत्त्वाचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या प्रदर्शनाच्या समारोपाप्रसंगी निमा अध्यक्ष आशिष नहार, किशोर राठी, मनीष रावल, राजेंद्र अहिरे, राजेंद्र वडनेरे, किरण पाटील, एमएसएमई कमिटी चेअरमन दिपाली चांडक व एचएएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande