
बीड, 20 जुलै (हिं.स.)।
विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), बीड जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी श्री. सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यात आला. तसेच NEET आणि TET परीक्षांतील कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री श्री. दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र तुकाराम मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रदेश पदाधिकारी, महिला आघाडी, विद्यार्थी, जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis