विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शरद पवार गटाचे लातूरात धरणे आंदोलन
लातूर, 20 जुलै (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) लातूर जिल्ह्याच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला
निवेदन


लातूर, 20 जुलै (हिं.स.)।

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) लातूर जिल्ह्याच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.

यावेळी सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यात आला. तसेच नीट (NEET) आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) यांमधील कथित गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष राजा माणियार, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. संभाजीराव पाटील, प्रदेश सचिव सोमेश्वर कदम, प्रदेश सचिव प्रा. माधव गंगापुरे, युवक अध्यक्ष भरत सूर्यवंशी, विभागीय अध्यक्ष ॲड. निशांत वाघमारे, ओबीसी विभागीय अध्यक्ष चंद्रशेखर कत्ते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande