वडवणी येथे सेवाभावी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
बीड, 20 जुलै (हिं.स.)। पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या सेवाभावी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते एकल माता मुलींना सायकलींचे वाटप तसेच विद्यार्
उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


बीड, 20 जुलै (हिं.स.)।

पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी येथे आयोजित करण्यात आलेल्या सेवाभावी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते एकल माता मुलींना सायकलींचे वाटप तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

समाजातील गरजू घटकांना आधार देतानाच शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी मागे राहू नये, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले.

पंकजा मुंडे यांच्या समाजाभिमुख नेतृत्वाच्या विचारांना साजेसा, अभिनव आणि लोकहिताचा हा उपक्रम असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. सायकली व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी प्रेरणा निर्माण करण्याबरोबरच समाजापुढे सकारात्मक संदेश देण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे उपस्थित मान्यवरांनी आणि नागरिकांनी कौतुक केले. अशा सेवाभावी उपक्रमांमुळे समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळत असून सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande