परभणीच्या 110 कोटींच्या विकास कामांना मंजूरी; पहिल्या टप्प्यातून 20 कोटी
परभणी, 21 जुलै (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेंतर्गत मूलभूत सोयी-सुविधांच्या कामांकरीता राज्याच्या नगरविकास विभागाने सुमारे 110 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. त्यापैकी 20 कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यातील तरतूद उपलब्ध केली आहे. खासदार स
परभणीच्या 110 कोटींच्या विकास कामांना मंजूरी; पहिल्या टप्प्यातून 20 कोटी : खासदार संजय जाधव यांच्या प्रयत्नांना यश


परभणी, 21 जुलै (हिं.स.)। परभणी महानगरपालिकेंतर्गत मूलभूत सोयी-सुविधांच्या कामांकरीता राज्याच्या नगरविकास विभागाने सुमारे 110 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. त्यापैकी 20 कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यातील तरतूद उपलब्ध केली आहे.

खासदार संजय जाधव यांनी काही महिन्यांपासून उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महानगरपालिका हद्दीतील विविध मूलभूत सोयी-सुविधांच्या कामांकरीता मोठ्या प्रमाणावर तरतूद उपलब्ध व्हावी, याकरीता प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी पाठपुरावाही केला. अखेर, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यास तत्वतः मान्यता दिल्या पाठोपाठ नगरविकास विभागाने या आर्थिक वर्षात लेखाशिर्ष 2217-0913 अंतर्गत 110 कोटी रुपयांच्या तरतूदीस मंजूरी दिली. पाठोपाठ 20 कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध केला. उर्वरित निधी लवकरात लवकर प्राप्त होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.नटराज रंग मंदिराच्या पुनर्जीवनाकरीता 30 कोटी... महानगरपालिका हद्दीतील नटराज रंग मंदिराच्या पुनर्जीवनाकरीता नगरविकास विभागाने 30 कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. त्यामुळे या नाट्य मंदिराच्या पुनर्जीवनाचा मार्ग मोकळा होणार आहे.प्रशासकीय इमारतीसाठी 60 कोटी... महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी नगरविकास विभागाने या तरतूदीतूनच 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. त्या निधीप्रमाणे मुख्य प्रशासकीय इमारतीचं काम सुरु होणार आहे.मूलभूत सोयी सुविधांकरीता मोठी तरतूद... नगर विकास विभागाने महापालिका क्षेत्रात मुलभूत सोयी - सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूदी अंतर्गत निधी दिला आहे. यातून शहरातील विविध प्रभागात रस्ते, नाल्या, पथदिवे तसेच इतर मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार.. स्थायी समिती बैठकीत सभापती प्रतिभा अतुल सरोदे यांनी शहरात समांतर पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजनेचे नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा ठराव घेतला होता. या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. या अगोदरच्या योजनेत समांतर पाणी पुरवठ्यासाठी 150 कोटी आणि भूमिगत गटारासाठी 450 कोटीचा निधी होता. हा प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यानंतर शहराच्या वाढीव भागाचा प्रस्तावात समावेश करुन नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. त्यानुसार समांतर पाणी पुरवठ्याच्या 250 कोटी आणि भूमिगत गटारच्या जवळपास 574 कोटी रुपयांच्या नवीन प्रस्तावास मंजुरी मिळेल, असे आश्वासन दिले आहे.शहर विकासासाठी कटीबध्द : खासदार जाधव... उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी परभणी शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी हमी दिली आहे. शहराच्या विकासासाठी निधी मंजुर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार व्यक्त करतो. तसेच परभणी शहराचा विकास हेच ध्येय परभणी शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबध्द विकास हेच माझे ध्येय आहे. नागरीकांना मुलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. 20 कोटी रुपयांचा निधी आला आहे. उर्वरित निधीसाठीही सतत पाठपुरावा सुरू राहिल. पाणी पुरवठा, भूमिगत गटारच्या वाढीव प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. शहराचा पुढील तीस वर्षाचा विस्तार लक्षात घेऊन ही योजना राबविण्यात येणार आहे. यापुढेही शहराच्या विकासासाठी कटीबध्द आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande