चंद्रपूर महापालिका परिसरात लोककल्याणकारी योजनांसाठी विशेष शिबिर
चंद्रपूर, 21 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ''छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान'' अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी क
चंद्रपूर महापालिका परिसरात लोककल्याणकारी योजनांसाठी विशेष शिबिर


चंद्रपूर, 21 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन बुधवार, दि. 22 जुलै 2026 रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 10.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चंद्रपूर शहर महानगरपालिका, पार्किंग परिसर, गांधी चौक, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती, विविध महसुली सेवा तसेच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना सुलभपणे उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी या विशेष महसूल अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande