परभणी - जांब बु. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी
परभणी, 21 जुलै, (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील जांब बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या जनता दरबारात निवेदनाद्वारे करण्यात आली
परभणी - जांब बु. प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याची मागणी


परभणी, 21 जुलै, (हिं.स.)। जिंतूर तालुक्यातील जांब बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या जनता दरबारात निवेदनाद्वारे करण्यात आली.

जांब बु. व परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवांसाठी सुमारे 14 किलोमीटर अंतरावरील आरोग्य केंद्रांवर जावे लागत असल्याने गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच आपत्कालीन रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जांब बु येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी अधोरेखित केले. जांब बु. हे परिसरातील अनेक गावांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास जांब बु, जांब तांडा, सारखेडा, सारखेडा येथील तांडे, जांब खुर्द, कुडा, कोलदंडी, मानमोडी, रायखेडा, रायखेडा तांडा, महादेवनगर तांडा, मालेगाव, पिंपळा आदी गावांतील हजारो नागरिकांना आरोग्य सेवेचा थेट लाभ मिळणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष कामगार आघाडीचे जिंतूर तालुकाध्यक्ष सचिन मोहनराव आढे यांनी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनाची दखल घेत पालकमंत्र्यांनी मागणीबाबत सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande