नाशिक : रासेगावातील स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत केमिकल टँक फुटला; दोघे जखमी
नाशिक, 21 जुलै (हिं.स.)। तालुक्यातील रासेगाव येथील स्पेक्ट्रम इथर्स या रासायनिक कृषी कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास केमिकल असलेले इम प्रेशराईज होऊन फुटल्याने छोटा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या घटन
नाशिक : रासेगावातील स्पेक्ट्रम इथर्स कंपनीत केमिकल टँक फुटला; दोघे जखमी


नाशिक, 21 जुलै (हिं.स.)। तालुक्यातील रासेगाव येथील स्पेक्ट्रम इथर्स या रासायनिक कृषी कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या कंपनीमध्ये मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास केमिकल असलेले इम प्रेशराईज होऊन फुटल्याने छोटा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दोन कामगार भाजल्याने जखमी झाले असून त्यांना तातडीने नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कृषी औषधे उत्पादक कंपनीत मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाचे रासायनिक ड्रम असून त्यातील एक ड्रमचा दाब वाढल्याने तो फुटला आणि त्यानंतर आग लागली. मात्र कंपनीची अग्निशमन यंत्रणा, नगरपरिषद अग्निशमन दल तसेच प्रशासनाच्या तत्परतेमुळे अवघ्या १५ ते २० मिनिटांत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले.निरीक्षक भगवान मथुरे, महसूल घटनेची माहिती मिळताच तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक, नगरपरिषद अग्निशमन दल व अन्य संबंधित यंत्रणा घटनास्थळी राबवून आग दाखल झाल्या. आवश्यक सुरक्षा उपाययोजना विझविण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

स्फोट आणि धुरामुळे कामगारांमध्ये घबराटड्रम फुटल्याचा आवाज आणि कंपनीतून उठणारे धुराचे लोट पाहून कामगारांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली. सर्व कामगारांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. रासायनिक कंपनी असल्याने परिसरात विविध अफवा पसरून नागरिकांमध्येही काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande