
परभणी, 21 जुलै, (हिं.स.)। माजी उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार 22 जुलै रोजी येथील ग्रामीण रुग्णालयात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत होणार्या या शिबिरामध्ये विविध आजारांची तपासणी, उपचार तसेच शासकीय आरोग्य योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शिबिरामध्ये रक्तदान, नेत्र तपासणी व उपचार, रक्तदाब व मधुमेह तपासणी, स्त्रीरोग तपासणी व उपचार तसेच अस्थिरोग तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत. याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना अंतर्गत विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड काढण्याची सुविधाही या शिबिरात उपलब्ध राहणार आहे. परिसरातील गरजू व सर्वसामान्य नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. एस. कराड यांनी केले आहे. हे शिबिर ग्रामीण रुग्णालय, सोनपेठ येथे दि. 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.एस. कराड यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis