मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्ताने रत्नागिरीत कृषी माऊली सोहळा
रत्नागिरी, 21 जुलै (हिं.स.) । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप महिला मोर्चातर्फे देवाभाऊ कृषी माऊली सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ८००० महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट आणि माती परीक्षण मार्गदर्श
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


रत्नागिरी, 21 जुलै (हिं.स.) । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप महिला मोर्चातर्फे देवाभाऊ कृषी माऊली सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ८००० महिला शेतकऱ्यांना मोफत कृषी किट आणि माती परीक्षण मार्गदर्शन केले जाणार आहे.

राज्य शासनाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रांतिकारी महिला शेतकरी बिल आणले. या ऐतिहासिक धोरणात्मक निर्णयावर आधारित आणि मुख्यमंत्र्यांचच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिलांना शेतीत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करणारा एक नावीन्यपूर्ण प्रयोग आता प्रत्यक्षात साकारत आहे.

भारतीय जनता पार्टी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून देवाभाऊ कृषी माऊली सोहळा या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना विशेष कृषी किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.

महिलाशक्तीच्या कल्पकतेला आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा करणारा हा प्रयोग महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात एक नवा इतिहास रचेल. या उपक्रमांतर्गत थेट माती परीक्षण प्रात्यक्षिक केले जाईल. जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, स्थानिक कृषी अधिकारी आणि कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांमार्फत महिलांना शेतातील मातीचा नमुना घेणे व सुपीकता ओळखण्याचे थेट प्रात्यक्षिक दिले जाईल.

महिलांचे श्रम कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक कापडी पिशवीतून प्रगत भाजीपाला बियाणे, जैविक खते, खुरपे, विळा अशी शेती उपयोगी अवजारे आणि रात्रीच्या सुरक्षिततेसाठी टॉर्च दिली जाईल. या पिशवीवर देवाभाऊ यांच्या फोटोसह भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश असे मुद्रित करण्यात आले आहे.

रत्नागिरीत भाजपच्या कार्यालयात सोमवार, दि. २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता होणार असलेल्या या कार्यक्रमाला रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा शर्मिला वैकुंठ पाटील आणि रायगड व परिसरातील महिला शेतकरी भगिनी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी

महिला मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्याशी 9527454532 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande