
परभणी, 21 जुलै (हिं.स.)। राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील अमराठी ऑटो रिक्षा व टॅक्सी परवाना धारक तसेच चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रशिक्षण दि. २१ जुलै ते १४ ऑगस्ट २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ३.०० वाजता जिल्हा परिषद कन्या प्रशाला व उच्च माध्यमिक विद्यालय, स्टेशन रोड, परभणी येथे (खोली क्र. १) आयोजित करण्यात आले आहे.सर्व अमराठी ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.दि. १६ ऑगस्ट २०२६ पासून परिवहन विभागाच्या तपासणीदरम्यान अमराठी ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांकडे हे प्रमाणपत्र नसल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.परभणी जिल्ह्यातील सर्व संबंधित चालक व परवाना धारकांनी या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होऊन मराठी संवाद कौशल्य विकसित करावे आणि वेळेत प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम कासार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis