लातूर - 22 जुलै रोजी सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प शिबिराचे आयोजन
लातूर, 21 जुलै (हिं.स.)। -महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै 2026 रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


लातूर, 21 जुलै (हिं.स.)। -महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै 2026 रोजी वाढदिवस आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तीच परंपरा कायम ठेवून भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व भाजपा शहर जिल्ह्याच्यावतीने युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली 22 जुलै 2026 रोजी शहरातील विविध 8 ठिकाणी सेवा यज्ञ महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

22 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते 05 या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंडलाच्यावतीने राजकुमार गोजमगुंडे यांच्या कार्यालयामध्ये सेवायज्ञ महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. महात्मा बसवेश्वर मंडलाच्यावतीने मार्केट यार्डातील एसबीआय बँकेसमोर असलेल्या शिवकुमार बिराजदार यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये, छत्रपती शिवाजी महाराज मंडलाच्यावतीने कम्युनिटी हॉल ग्रिन बेल्ट आदर्श कॉलनी लातूर, महर्षी स्वामी दयानंद सरस्वती मंडलाच्यावतीने सरस्वती विद्यालय प्रकाश नगर लातूर, छत्रपती संभाजी राजे मंडलाच्यावतीने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हरंगुळ बु लातूर, श्री.सिध्देश्वर मंडलाच्यावतीने रत्नापूर चौक लातूर, माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडलाच्यावतीने जेएसपीएम लातूर तर दि.23 जुलै 2026 रोजी छत्रपती शाहू महाराज मंडलाच्यावतीने लातूर तालुक्यातील कव्हा येथे सेवा यज्ञ महारक्तदान संकल्प शिबराचे आयोजन करण्यात आलेले आहे.

त्यामुळे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली ठेवण्यात आलेल्या सेवायज्ञ महारक्तदान संकल्प शिबीरात मोठ्या संख्येने तरुणाईने सहभाग घेऊन रक्तदान करावे आणि लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने आयोजित ऐतिहासिक रक्तदान शिबीराची नोंद राज्यामध्ये क्रमांक एकवर होण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

रक्तदानाच्या या पवित्र कार्याची ऐतिहासिक नोंद व्हावी - अजित पाटील कव्हेकर

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस सेवा सज्ञ महारक्तदान संकल्प म्हणून लातूरसह राज्यभरात साजरा करीत आहोत. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाईने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून ऐतिहासिक रक्तदान करून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आवाहनानुसार रक्तदान करावे आणि रक्तदानरूपी सामाजिक कार्यातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande