रत्नागिरी : डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती
रत्नागिरी, 21 जुलै, (हिं.स.) । जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आखण्यात आलेल्या डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन नव्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी याबाबतचा आदेश
रत्नागिरी : डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन अशासकीय सदस्यांची नियुक्ती


रत्नागिरी, 21 जुलै, (हिं.स.) । जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आखण्यात आलेल्या डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर तीन नव्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.

नवनियुक्त अशासकीय सदस्य असे - रवींद्र महादेव नागरेकर (मु. शीळ, पो. ता. राजापूर), दिलीप श्रीपत राणे (मु. पो. तुळशी, ता. खेड), सुलोचना दशरथ कोंबकर (मु. पो. वाल्मीकीनगर, ता. मंडणगड)

जिल्ह्यातील मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा व राजापूर हे तालुके 'पूर्ण गट' म्हणून तर दापोली आणि गुहागर हे तालुके 'उपगट' म्हणून डोंगरी भागात समाविष्ट करण्यात आले आहेत. या भागातील विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी व नियोजन करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. डोंगरी भागातील आमदार, भागातील संबंधित दोन अशासकीय सदस्य, तसेच एक महिला सदस्य, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी/समन्वय अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य सचिव- जिल्हा नियोजन अधिकारी हे समितीचे सदस्य आहेत.

नवनियुक्त अशासकीय सदस्यांची नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा कार्यालयाकडून ही नियुक्ती रद्द होईल यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत अबाधित राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande