'आदिपुरुष' ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती; मी देशाची माफी मागतो - मनोज मुंतशीर
मुंबई, 25 जुलै, (हिं.स.)। ''आदिपुरुष'' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन वर्षांनी, त्याचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया उघडपणे व्यक्त केली आहे. एका अलीकडील मुलाखतीत, त्यांनी या चित्रपटाला आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठ
'आदिपुरुष' ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती; मी देशाची माफी मागतो: मनोज मुंतशीर


मुंबई, 25 जुलै, (हिं.स.)। 'आदिपुरुष' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन वर्षांनी, त्याचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया उघडपणे व्यक्त केली आहे. एका अलीकडील मुलाखतीत, त्यांनी या चित्रपटाला आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठी चूक म्हटले आणि कबूल केले की, चित्रपटाचा आणि त्यातील संवादांचा बचाव करणे ही त्याहूनही मोठी चूक होती.

चित्रपटाभोवती निर्माण झालेला वाद आणि त्यामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला. मनोज म्हणाले, 'आदिपुरुष' ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती आणि तिचा बचाव करणे ही त्याहूनही मोठी चूक होती. जे काही घडले त्याबद्दल मी हात जोडून देशाची माफी मागतो.

मनोज मुंतशीर यांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांना वाटले होते की चित्रपटाबाबतची टीका कालांतराने शांत होईल, परंतु अवघ्या दोन दिवसांतच त्यांना आपली चूक उमजली. त्यांनी नमूद केले की, आता मागे वळून पाहताना आपण लिहिलेल्या संवादांबद्दल त्यांना लाज वाटते. त्यांच्या मते, त्या वेळी आपण अशा ओळी कशा लिहिल्या हे त्यांना आजही समजत नाही. प्रेक्षकांचा राग पूर्णपणे न्याय्य होता आणि या टीकेतून आपण खूप काही शिकलो, हे त्यांनी मान्य केले.

ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट जून २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रभास, कृती सेनन आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट रामायणावर आधारित होता, परंतु त्यातील संवाद आणि भगवान हनुमान व रावण यांच्या सादरीकरणामुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. वाद वाढल्यानंतर निर्मात्यांनी काही संवाद बदलले असले तरी, प्रेक्षकांची नाराजी कमी झाली नाही. अलीकडेच, सीतेची भूमिका साकारणाऱ्या कृती सेनननेही सांगितले की, चित्रपटाला मिळालेल्या टीकेमुळे तिला खूप दुःख झाले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande