जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून अनाहत सिंगचे अभिनंदन
नवी दिल्ली, 26 जुलै (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 च्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. अनाहत सिंग हिने सुवर्णपदक जिंकून जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिली भारती
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 26 जुलै (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 च्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. अनाहत सिंग हिने सुवर्णपदक जिंकून जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय स्क्वॉश खेळाडू होण्याचा मान मिळवला. याबद्दल त्यांनी अत्यंत सार्थ अभिमान व्यक्त केला.पंतप्रधानांनी नमूद केले की, या यशामुळे तरुणांमध्ये स्क्वॉश हा खेळ अधिक लोकप्रिय होईल.

एक्स या समाजमाध्यमावरील एका टिप्पणीमध्ये पंतप्रधान लिहिले की, 2026 च्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एक ऐतिहासिक कामगिरी.

सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारी पहिली भारतीय स्क्वॉश खेळाडू ठरल्याबद्दल अनाहत सिंगचा अभिमान वाटतो. या यशामुळे तरुणांमध्ये स्क्वॉश हा खेळ अधिक लोकप्रिय होण्यास मदत होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande