विठुरायाच्या चरणी केंद्रीय प्रतापराव जाधव यांचे साकडे
सोलापूर, 26 जुलै (हिं.स.) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत देशवासीयांच्या आरोग्यासाठी आणि
Kdkd


सोलापूर, 26 जुलै (हिं.स.) आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत देशवासीयांच्या आरोग्यासाठी आणि बळीराजाच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. “सर्वांना निरोगी आयुष्य लाभो, बळीराजासाठी चांगला पाऊस पडो आणि देश सुख-समृद्धीने नांदो,” असे साकडे त्यांनी विठ्ठल चरणी घातले.

आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले असून, भक्तिमय वातावरणात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेत देशातील प्रत्येक नागरिक उत्तम आरोग्याने दीर्घायुषी होवो, अशी प्रार्थना केली.

केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. कोरोनामुळे खंड पडलेली दोन वर्षे वगळता त्यांनी सलग ४३ व्या वर्षीही आषाढी वारीत सहभागी होत विठ्ठलाचे दर्शन घेतले. “प्रत्येक भारतीय निरोगी राहो, बळीराजा सुखी राहो आणि राज्यात भरपूर पाऊस पडो,” अशी प्रार्थना करत त्यांनी यंदाची वारी विठ्ठल चरणी समर्पित केली.

आषाढी वारीदरम्यान आयुष मंत्रालयाच्या वतीने वारकऱ्यांसाठी पारंपरिक आयुर्वेदिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पंढरपूरमधील तीन रस्ता महाआरोग्य शिबिर, चंद्रभागा तीर आणि ६५ एकर परिसरातील आरोग्य केंद्रांवर आयुष सेवा केंद्रे उभारण्यात आली आहेत.

या केंद्रांवर वारकऱ्यांना आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधांचे वाटप, योग मार्गदर्शन, स्नेहन-स्वेदन (वाफ उपचार), तेल मालिश, विध्दकर्म, अग्निकर्म तसेच चरणसेवा अशा विविध आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जात असून, वारकऱ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande