वारकरी संप्रदाय, हिंदु धर्मात फूट पाडण्याचे कटकारस्थान करणार्यांविरोधात संघटित होण्याचा निर्धार !
* वारकर्‍यांच्या मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ ! पंढरपूर, 26 जुलै (हिं.स.) - वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, डावे, पुरोगामी त्याला खिळखिळा करण्याच
वारकरी महाअधिवेशन


उपस्थित वारकरी


* वारकर्‍यांच्या मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ !

पंढरपूर, 26 जुलै (हिं.स.) - वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, डावे, पुरोगामी त्याला खिळखिळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक असून त्याने वेळोवेळी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. धर्मनिष्ठ अशा वारकरी संप्रदायात वारकरी आणि हिंदु धर्म वेगळा असा भासवण्याचे षडयंत्र चालू आहे. वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडण्याचे कटकारस्थान करणार्‍यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार वारकरी महाअधिवेशनात करण्यात आला. वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठ येथे शनिवारी वारकरी महाअधिवेशन आयोजित केले होते. त्या अधिवेशनात हा निर्धार व्यक्त करण्यात आला. ‘श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला’चे महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनासाठी १००० पेक्षा अधिक वारकरी भाविक उपस्थित होते.

या अधिवेशनात वारकरी संप्रदायातील हिंदुत्वासाठी कार्य करणारे वारकरी महाराज आणि पूजनीय संत यांना ‘घुसखोर’ संबोधून त्यांचा अवमान करणार्‍या तथाकथित पुरोगाम्यांचा जाहीर निषेध करण्यात आला, तसेच हिंदुत्वनिष्ठ व संत यांचा जाहीर सन्मान करण्यात आला.

संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी आमदार संजय जगताप यांनी २० ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्ती उपस्थितांना भेट देण्यासाठी अर्पण म्हणून दिल्या. या प्रसंगी इंचगिरी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. रामदास महाराज चौधरी, ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

विशेष सन्मान - हुपरी (कोल्हापूर) येथे निवेदन, तसेच विविध मार्गाने आंदोलन करून अवैध मदरसा तोडण्यास भाग पाडणारे श्री. नितीन काकडे, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीदेवी मंदिरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनाच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे श्री. गणेश लंके, गोरक्षणाच्या कामात सातत्याने काम करणारे राष्ट्रीय वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प अंभोरे महाराज कारभारी यांचा संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

हिंदूंनी इतिहासबोध, शत्रूबोध लक्षात घेऊन हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृतीशील होणे आश्यक ! - प.पू. रामगिरी महाराज

हिंदू इतिहासातून शिकत नाहीत आणि आपण संघटित नाही त्यामुळेच अनेक आक्रमकांनी आपल्यावर राज्य केले. धर्मावर होणार्‍या आघातांविषयी आपण जागृत नसल्याने आज अन्य धर्मिय आिण चुकीचे विचार पसरवण्याचे फावते आहे. वारकरी संप्रदाय हा जगाला देण्याचे, जोडण्याचे काम काम करतो अशा वारकरी संप्रदायाविषयी आज भ्रमित करणारे विचार पसरवले जात आहेत, ‘समता’ दिंडी काढली जात आहे. आज काही जण पंढरपूरचा पांडुरंग हा विठ्ठल नसून अन्य कुणी असल्याचे सांगत आहे. जगात धर्म एकच असून तो म्हणजे सनातन धर्म आहे. लोकांना आज हिंदु धर्माचे महत्त्व न समजल्याने ते अन्य धर्मात जात आहेत. ‘लव्ह जिहाद’चे लोण आता प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत पोचले आहे. लहान मुलांनाचही बुद्धीभेद करून त्यांना इस्लामच्या प्रार्थना शिकवल्या जात आहेत. गोवंश रक्षणाच्या संदर्भात सरकारने मे महिन्यात एक अध्यादेश काढला असून जर एखाद्या परिसरात अवैधरितीने गोहत्या झाल्यास त्याला पोलीस, तहसीलदार, प्रशासन तितकेच उत्तरदायी आहेत ! हे लक्षात घेऊन आपण प्रशासनास गोहत्या थांबवण्यासाठी भाग पाडले पाहिजे.’’

वारकरी संप्रदायात घुसलेले खरे घुसखोर कोण ही सांगण्याची आता वेळ आली आहे ! - सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

संघटित असलेल्या वारकरी संप्रदायात हेतूपुरस्सर दुफळी पाडण्याचे त्यांचा जाणीवपूर्वक बुद्धीभेद करण्याचे काम चालू आहे. श्री विठ्ठलाची भक्तीचे वर्णन करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे अनेक अभंग असतांना जाणीवपूर्वक ‘अल्लाशिवाय कुणी श्रेष्ठ नाही’, ‘अल्ला दिलावे-अल्ला खिलावे’, अशा प्रकारची केवळ एकांगी प्रसार करणारे फलक वारीच्या वाटेवर लावले जात आहेत. हे षड्यंत्र आपण वेळीच ओळखून हे हाणून पाडले पाहिजे. वारकरी संप्रदायात वारकरी संप्रदायात घुसलेले खरे घुसखोर कोण आहेत हे सांगण्याची आता वेळ आली आहे. महाराष्ट्रासाठी वारकरी संप्रदाय प्राण असून हिंदु धर्म आत्मा आहे ! देहलीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात ‘पेपरफुटीच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाच्या नावाखाली पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या, पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. तिथे दंगलसदृष्य परिस्थिती होती. यात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. हे देशविरोधी षडयंत्र आपण लक्षात घेऊन त्याविरोधात कृती करण्याचा निर्धार केला पाहिजे.’’

विहिपचे ह.भ.प. नारायण महाराज शिंदे म्हणाले , ‘‘वारकर्‍यांच्या भोळेपणाला लाभ घेऊन काही लोक त्यांना निरनिराळ्या प्रकारची अमिषे दाखवून त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. तरी यापुढील काळात वारकरी संप्रदायात घुसलेले कीर्तनकार शोधून काढून त्यांना समोर आणणे आवश्यक आहे!’’ राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.म. महेंद्र महाराज म्हस्के म्हणाले, ‘‘सध्या देव, देश, धर्म यांच्यापुढे अनेक मोठी आव्हाने आहेत. संप्रदायासाठी काम करणारे अनेक लोक धर्माच्या व्यासपीठावर येऊन त्यांचे मत व्यक्त करण्यास घाबरतात; मात्र प.पू. वक्ते महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण वैदिक सनातन हिंदू आहोत मग वारकरी आहोत’, हे नेहमी लक्षात ठेवावे लागेल. राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला; मात्र हा कायदा कठोर केला पाहिजे. सर्व तीर्थक्षेत्रे मद्यमांस मुक्त केली पाहिजेत. इंद्रायणी, चंद्रभागा या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत.’’

राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने-शास्त्री म्हणाले, ‘‘अन्य धर्मिय संघटित असल्याने त्यांचा प्रत्येक मागण्यांची नोंद शासनाला घ्यावी लागते, तर हिंदू संघटित नसल्याने आज हिंदु धर्मावर आघात होत आहेत. गोमातेला राजमातेचा दर्जा असतांना पशूवधगृहाची अनुमती दिली जाते, दे दुर्दैवी आहे.’’ प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित म्हणाले, ‘‘वज्रलेपनच्या संदर्भात फोलपणा माहिती असूनही जाणीवपूर्वक मंदिर समितीने वज्रलेप करण्याचा अट्टाहास केला. याला मंदिर महासंघासह वारकरी संप्रदायाने पत्रकार परिषद घेऊन यातील फोलपणा समोर आणला, तसेच न्यायालयीन लढाईद्वारे याला स्थगिती मिळवली.’’

विविध ठरावांचा ‘हर हर महादेव’च्या गजरात पाठिंबा !

पंढरपूर येथील पुरातत्व विभागाच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील रासासयनिक लेपन प्रक्रिया या धर्मविरोधी निर्णयाच्या विरोधात वारकरी आणि मंदिर महासंघ यांनी लढा दिला आणि यापुढील काळात कोणत्याही प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये, संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ स्थगित असून यापुढे सरकारने देवभूमीचे रक्षण करणारा ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’ लागू करावा यांसह करण्यात आलेल्या विविध ठरावांना वारकरी-भाविक यांनी ‘हर हर महादेव’च्या गजरात पाठिंबा दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande