लातूर : सार्वजनिक ठिकाणी नियमभंग करणाऱ्यांवर महापालिकेचा दणका
लातूर, 26 जुलै (हिं.स.)। सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणे,सिंगल युज कॅरीबॅगचा वापर, अनधिकृत बॅनर लावणे,अतिक्रमणे करणे यासह विविध कारणांसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध आस्थापनांना ९४ हजार ६०० रुपयांचा दंड करण्यात आला. लातूर शहर स्वच्छ
मनपा कारवाई


लातूर, 26 जुलै (हिं.स.)। सार्वजनिक रस्त्यावर कचरा टाकणे,सिंगल युज कॅरीबॅगचा वापर, अनधिकृत बॅनर लावणे,अतिक्रमणे करणे यासह विविध कारणांसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने विविध आस्थापनांना ९४ हजार ६०० रुपयांचा दंड करण्यात आला.

लातूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. परंतु अनेकदा व्यावसायिक व व्यापाऱ्यांकडून अस्वच्छता केली जाते. अशा व्यापारी, व्यावसायिक व आस्थापनांना सूचना देऊन त्यानंतरही फरक नं पडल्यास कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, उपायुक्त वसुधा फड,मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे यांनी दिलेले होते.

त्यानुसार मनपाच्या स्वच्छता विभागाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबाजोगाई रोड, औसा रोड, गांधी चौक, गंजगोलाई, राजीव गांधी चौक, शाहू चौक, कव्हा नाका, अहिल्यादेवी होळकर चौक, आंबा हनुमान, विवेकानंद चौक या परिसरात दंडात्मक कार्यवाही केली. एकूण ९४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ए झोनमध्ये १३ हजार रुपये, बी झोन मध्ये २९ हजार रुपये, सी झोनमध्ये १५ हजार रुपये व डी झोन मध्ये ३७ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत मुख्य स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे,शिवराज शिंदे, अक्रम शेख, धोंडीराम सोनवणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande