लातूरमध्ये महाराजस्व अभियान शिबिरात १ हजारांहून अधिक विविध प्रमाणपत्रांचे वाटप
लातूर, 27 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हजारो नागरिकां
शिबिराला विक्रमी प्रतिसाद


लातूर, 27 जुलै (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. शिबिरात १,०९७ उत्पन्न, ६४० रहिवासी, ३२० अधिवास, १३३ जात, १७९ नॉन-क्रिमिलेअर, १९७ ईडब्ल्यूएस आणि २२ अल्पभूधारक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कृषी विभागामार्फत १,७९२ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच २६० प्रकरणांना मंजुरी, ६८७ नवीन मतदार नोंदणी आणि १,१२० विद्यार्थ्यांना एसटी बस पास वितरित करण्यात आले. यासोबतच ट्रॅक्टर, कृषी अवजारे, विविध शासकीय योजनांचे मंजुरी आदेश आणि इतर सेवांचा लाभही नागरिकांना देण्यात आला. शिवाय, विशेष बैठक घेऊन ३५ वर्षांवरील अविवाहित महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा, तर जुलै महिन्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना संजय गांधी विधवा निराधार योजनेचा लाभ मंजूर करून आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि जिल्हा परिषद अध्यक्षा उषा पाटील तळेगावकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande