फ्रेंडशिप डे निमित्त डी बिअर्स इंडियाची खास मोहीम; ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’द्वारे मैत्रीच्या चिरंतन नात्याचा गौरव
नागपूर, 24 जुलै (हिं.स.) : आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीच्या नात्याचा सन्मान करण्यासाठी डी बिअर्स इंडियाने फ्रेंडशिप डे निमित्त ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. नैसर्गिक हिऱ्यांच्या माध्यमातून मैत्रीच्या अनोख्या बंधाचा उत्सव साज
प्रतिकात्मक लोगो


नागपूर, 24 जुलै (हिं.स.) : आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीच्या नात्याचा सन्मान करण्यासाठी डी बिअर्स इंडियाने फ्रेंडशिप डे निमित्त ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ या विशेष मोहिमेची घोषणा केली आहे. नैसर्गिक हिऱ्यांच्या माध्यमातून मैत्रीच्या अनोख्या बंधाचा उत्सव साजरा करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा भाग म्हणून 1 ते 2 ऑगस्टदरम्यान मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, पुणे, कानपूर, कोची, कोईमतूर आणि नागपूर या नऊ शहरांतील जिवलग मित्र-मैत्रिणींना विशेष अनुभवासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. फॉरेव्हरमार्क डायमंड ज्वेलरी स्टोअर्ससह 60 रिटेल भागीदार स्टोअर्समध्ये ग्राहकांना या खास संग्रहाचा अनुभव घेता येणार आहे.

या मोहिमेचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘बेस्टी ब्रेसलेट कलेक्शन’. नैसर्गिक हिऱ्यांनी सजवलेल्या या संग्रहामध्ये चार खास डिझाइन्सचा समावेश आहे. हे ब्रेसलेट्स विशेषतः जिवलग मित्र-मैत्रिणींनी जोडीने परिधान करण्यासाठी तयार करण्यात आले असून, सामायिक आठवणी आणि मैत्रीचे सुंदर प्रतीक म्हणून त्यांची रचना करण्यात आली आहे.

या संग्रहातील एका डिझाइनमध्ये बॅगेट आणि गोलाकार हिऱ्यांच्या माध्यमातून मॉर्स कोडमध्ये “BFF” दर्शविण्यात आले आहे. तसेच एकमेकांमध्ये गुंफले जाणारे वर्तुळाकार डिझाइन्स मैत्रीच्या अतूट बंधाचे प्रतीक आहेत. अस्सल आणि नैसर्गिक मैत्रीप्रमाणेच नैसर्गिक हिरा देखील दुर्मीळ आणि चिरंतन असल्याचा संदेश या संग्रहातून देण्यात आला आहे.

स्टोअरमध्ये येणाऱ्या प्रत्येक मित्र-मैत्रिणींच्या जोडीसाठी हा अनुभव विनामूल्य उपलब्ध असेल. या अनुभवाचे तीन टप्पे असतील:

0

‘बॉण्ड टुगेदर’ – मित्र-मैत्रिणींना एक्स्प्रेस नेल-आर्टसह एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल.

‘क्रिएट टुगेदर’ – दोघेही एकमेकांसाठी खास बॅग चार्म तयार करतील, जी त्यांच्या मैत्रीची आठवण म्हणून जपता येईल.

‘कॅप्चर फॉरेव्हर’ – विविध प्रॉप्ससह फोटोशूट आणि ‘बेस्टी कॉन्ट्रॅक्ट’वर स्वाक्षरी करून मैत्रीचा हा खास क्षण कायमस्वरूपी जतन केला जाईल.

डी बिअर्स इंडियाच्या कॅटेगरी मार्केटिंगच्या कंट्री हेड तोरांज मेहता म्हणाल्या की, खरी मैत्री ही निर्माण करता येत नाही, ती नैसर्गिकरित्या फुलत जाते. ‘लव्ह, फ्रॉम बेस्टी’ या मोहिमेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीच्या नात्याचा सन्मान करण्यासाठी एक अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, दुसऱ्या वर्षात डी बिअर्स या भावनेला एका सुंदर परंपरेचे रूप देत आहे. ब्रेसलेट्सच्या बारकाईने तयार केलेल्या डिझाइन्सपासून ते रिटेल स्टोअर्समधील खास अनुभवांपर्यंत प्रत्येक गोष्ट नैसर्गिक हिऱ्याप्रमाणेच चिरंतन आणि अस्सल नात्याचा सन्मान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

जिवलग मित्र-मैत्रिणींना या विशेष उपक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर भेट देता येईल:

https://withlovefrombestie.netlify.app/

अधिक माहितीसाठी आणि स्टोअरच्या तपशीलांसाठी भेट द्या:

[www.adiamondisforever.com](http://www.adiamondisforever.com)

------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande