सोशल मीडियावर आता 'ई-20 जनता पार्टी'ची स्थापना
इंस्टाग्राम पेजला आतापर्यंत 2.20 लाख फॉलोअर्स मिळाले नवी दिल्ली, 27 जुलै (हिं.स.) : नीट पेपर लीक प्रकरणावर चर्चेत आलेल्या ''कॉकरोच जनता पार्टी'' च्या डिजिटल आंदोलनानंतर आता ई-20 इंधनाला विरोध करणाऱ्या ''ई-20 जनता पार्टी'' नावाच्या नव्या ऑनल
प्रतिकात्मक लोगो


इंस्टाग्राम पेजला आतापर्यंत 2.20 लाख फॉलोअर्स मिळाले

नवी दिल्ली, 27 जुलै (हिं.स.) : नीट पेपर लीक प्रकरणावर चर्चेत आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' च्या डिजिटल आंदोलनानंतर आता ई-20 इंधनाला विरोध करणाऱ्या 'ई-20 जनता पार्टी' नावाच्या नव्या ऑनलाइन समुदायाची सोशल मीडियावर झपाट्याने वाढ होत आहे. इंस्टाग्रामवर या पेजला आतापर्यंत 2.20 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाले असून, ही संख्या सातत्याने वाढत आहे.

या तथाकथित 'पक्षा'ची प्रमुख मागणी म्हणजे ग्राहकांना कमी दरात 100 टक्के शुद्ध पेट्रोल निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा. ई-20 इंधन धोरणामुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र, केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की एथनॉलमिश्रण नसलेल्या पारंपरिक पेट्रोलकडे परत जाण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या पेट्रोलला ई-20 म्हटले जाते, कारण त्यामध्ये 20 टक्के एथनॉलचे मिश्रण असते. सरकारच्या मते, हे अधिक प्रगत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक इंधन आहे.दुसरीकडे, ई-20 इंधनाचे विरोधक असा दावा करतात की या इंधनामुळे वाहनांचे मायलेज कमी होते तसेच इंजिनच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो.

यावर सरकारचे म्हणणे आहे की, प्रयोगशाळेतील चाचण्या किंवा प्रत्यक्ष वापरात ई-20 मुळे इंजिनचे नुकसान किंवा झीज होत असल्याचा कोणताही ठोस पुरावा आढळलेला नाही. मात्र, E10 इंधनासाठी तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्ये ई-20 वापरल्यास मायलेजमध्ये किंचित घट होऊ शकते, हे सरकारने मान्य केले आहे.दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या यशानंतर ई-20 जनता पार्टीचा उदय महत्त्वाचा मानला जात आहे.

------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande