जीप मेरिडियनची ८५ वी एनिवर्सरी एडिशन भारतात लाँच; फक्त ८५ युनिट्सची मर्यादित विक्री
मुंबई, 27 जुलै (हिं.स.)। लक्झरी एसयूव्ही निर्माता जीप इंडियाने आपल्या ७-सीटर जीप मेरिडियनचे ८५ वी एनिवर्सरी एडिशन भारतीय बाजारात लाँच केले आहे. या विशेष आवृत्तीची एक्स-शोरूम किंमत ३६.०५ लाख रुपये ठेवण्यात आली असून, कंपनीने याची किंमत स्टँडर्ड टॉप-स
Jeep Meridian 85th Anniversary Edition Launched in India


मुंबई, 27 जुलै (हिं.स.)। लक्झरी एसयूव्ही निर्माता जीप इंडियाने आपल्या ७-सीटर जीप मेरिडियनचे ८५ वी एनिवर्सरी एडिशन भारतीय बाजारात लाँच केले आहे. या विशेष आवृत्तीची एक्स-शोरूम किंमत ३६.०५ लाख रुपये ठेवण्यात आली असून, कंपनीने याची किंमत स्टँडर्ड टॉप-स्पेक ओव्हरलँड व्हेरिएंटइतकीच ठेवली आहे. विशेष म्हणजे ही एडिशन केवळ ८५ युनिट्सपुरती मर्यादित असणार आहे.

या एनिवर्सरी एडिशनमध्ये काही आकर्षक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. गाडीच्या पुढील दरवाजांवर, टेलगेटवर आणि व्हील सेंटर कॅप्सवर ‘८५ वी एनिवर्सरी’ डिकल्स देण्यात आले आहेत. याशिवाय ग्लॉस ब्लॅक फिनिशचे १८ इंचांचे अलॉय व्हील्सही या मॉडेलचे खास आकर्षण आहे. ही एसयूव्ही व्हाईट, मेटॅलिक ग्रीन, रेड, ग्रिजिओ मॅग्नेसिओ आणि ब्लॅक अशा रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गाडीच्या केबिनमध्ये ऑल-ब्लॅक थीम देण्यात आली असून डॅशबोर्डवर मायन गोल्ड ट्रिम, कॉन्ट्रास्ट डिटेलिंग आणि एम्बिएंट लाइटिंगची सुविधा आहे. याशिवाय कंपनीने ‘८५ वी एनिवर्सरी एएक्सएस पॅकेज’ हा पर्यायी एक्सेसरी पॅकही उपलब्ध करून दिला आहे. या पॅकेजमध्ये कार्पेट फ्लोअर मॅट्स, एनिवर्सरी डिकल किट, अपग्रेडेड एम्बिएंट लाइटिंग पॅकेज आणि पॅनोरॅमिक सनरूफ इल्युमिनेशन यांचा समावेश आहे. या विशेष आवृत्तीसोबत जीप मेरिडियनमध्ये स्टेलॅन्टिसचे ‘कारा एआय’ इन-कार व्हॉइस असिस्टंटही प्रथमच देण्यात आले आहे. हे व्हॉइस असिस्टंट ५२ भाषांना सपोर्ट करते, ज्यामध्ये अनेक भारतीय भाषांचाही समावेश आहे. नैसर्गिक आवाजातील कमांडच्या माध्यमातून प्रवासी इन्फोटेनमेंट सिस्टीमला हात न लावता नेव्हिगेशन, हवामानाची माहिती, म्युझिक, फोन कॉल, रिमाइंडर्स आणि वाहनातील काही महत्त्वाची फिचर्स नियंत्रित करू शकतात.

या विशेष आवृत्तीमध्ये यांत्रिकदृष्ट्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात २.० लिटर टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले असून ते १६८ बीएचपीची शक्ती आणि ३५० एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ९-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असून, पूर्वीप्रमाणेच दमदार कामगिरी कायम ठेवण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande