
मुंबई, 27 जुलै (हिं.स.) : एमव्ही इलेक्ट्रोसिस्टीम्स लिमिटेडने (“कंपनी) आपल्या इनिशियल पब्लिक ऑफरसाठी (आयपीओ) प्रत्येकी ₹५ दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी ₹४०० ते ₹४२५ चा किंमतपट्टा निश्चित केला आहे. कंपनीचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (“आयपीओ” किंवा “इश्यू”) सबस्क्रिप्शनसाठी गुरुवार, ३० जुलै २०२६ रोजी उघडेल आणि सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान ३४ इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर ३४ इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली (Bid) लावू शकतात.
आजच्या तारखेनुसार कंपनीचे एकूण २,०४,५९,२०० इक्विटी शेअर्स (प्रत्येकी ₹५ मूल्याचे) आऊटस्टॅडिंग (outstanding) आहेत. हा आयपीओ ₹२,९०० दशलक्षपर्यंतच्या इक्विटी शेअर्सची नवी विक्री (Fresh Issue) आहे.
इश्यूमधून मिळणाऱ्या रकमेपैकी ₹१,८०० दशलक्ष रक्कम कंपनीच्या दीर्घकालीन कार्यभांडवलाच्या (working capital) गरजा भागवण्यासाठी, ₹२१० दशलक्ष रक्कम नवीन पॉवर इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या संशोधन, डिझाइन आणि विकास उपक्रमांमधील गुंतवणुकीसाठी, आणि उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरली जाईल.
हा इश्यू बुक-बिल्डिंग प्रक्रियेद्वारे जारी केला जात आहे, ज्यामध्ये इश्यूचा ५०% पेक्षा कमी नाही (किंवा ७५% पेक्षा कमी नाही) भाग पात्र संस्थात्मक बोलीदारांना (QIBs), आणि अनुक्रमे १५% पेक्षा जास्त नाही व १०% पेक्षा जास्त नाही भाग बिगर-संस्थात्मक बोलीदारांना (NIBs) आणि किरकोळ वैयक्तिक बोलीदारांना (Retail Individual Bidders) वाटप केला जाईल.
एमव्ही इलेक्ट्रोसिस्टीम्स लिमिटेड ही तंत्रज्ञान-चलित कंपनी असून ती रेल्वे रोलिंग स्टॉकमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिकल आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या डिझाइन, विकास, असेंब्ली आणि उत्पादनात कार्यरत आहे. यामध्ये इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हसाठी IGBT-आधारित ३-फेझ ड्राईव्ह प्रोपल्शन उपकरणे, रेल्वे कोच आणि EMU चे स्विचगिअर पॅनल्स, केबल संरक्षण आणि व्यवस्थापन उत्पादने आणि इलेक्ट्रिकल घटक, सिस्टीम्स आणि सब-सिस्टीम्सचा समावेश आहे.
स्वदेशी नवोपक्रम (indigenous innovation) आणि शाश्वत रेल्वे वाहतुकीवर लक्ष केंद्रित करून, कंपनी स्वावलंबन, रेल्वेचे विद्युतीकरण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या (decarbonization) राष्ट्रीय व जागतिक उद्दिष्टांशी सुसंगत काम करत आहे.
कंपनीला तिच्या IGBT आधारित ३-फेझ ड्राईव्ह प्रोपल्शन उपकरणांसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये CLW कडून मंजुरी मिळाली आहे आणि मार्च २०२६ मध्ये भारतीय रेल्वेला ३-फेझ प्रोपल्शन उपकरणांचा व्यावसायिक पुरवठा देखील सुरू केला आहे. या ३-फेझ प्रोपल्शन उपकरणांमध्ये ट्रॅक्शन कन्व्हर्टर-इन्व्हर्टर सिस्टीम, ऑक्झिलरी कन्व्हर्टर, व्हेईकल कंट्रोल युनिट्स / ट्रेन कंट्रोल मॅनेजमेंट सिस्टीम आणि ड्रायव्हर डिस्प्ले युनिट्स यांचा समावेश आहे - जे सर्व आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि कामगिरी मानकांची पूर्तता करण्यासाठी कंपनीद्वारे स्वदेशी पद्धतीने डिझाइन व विकसित केले गेले आहेत.
कंपनीने पीएनसी टेक्नॉलॉजीज कंपनी लिमिटेड, दक्षिण कोरिया सोबत तीन वर्षांच्या कालावधीसाठी व्यवसाय सहकार्य करार (Business Cooperation Agreement) केला आहे. देशाभरातील २५ केव्ही रेल्वे ओव्हर-हेड इलेक्ट्रिफिकेशन लाईनसाठी ऑटो फॉल्ट लोकेटर सिस्टीमचे उत्पादन, पुरवठा आणि वितरणासाठी एक्सक्लुझिव्ह सहकार्य करणे हा या कराराचा उद्देश आहे. या कराराद्वारे कंपनीने रेल्वे इलेक्ट्रिकल पायाभूत सुविधांच्या उत्पादनांच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.
याशिवाय, कंपनीला ६ (सहा) MEMU ट्रेन्ससाठी मायक्रोप्रोसेसर नियंत्रित IGBT आधारित ३ फेझ प्रोपल्शन उपकरणांचे डिझाइन, विकास, उत्पादन, पुरवठा, चाचणी आणि कमिशनिंगसाठी मॉडर्न कोच फॅक्टरी, रायबरेली कडून २७ जून २०२६ रोजीचे स्वीकृती पत्र (Letter of Acceptance) मिळाले आहे. याची एकूण ऑर्डर किंमत ₹८६५.४६ दशलक्ष आणि पाच वर्षांच्या व्यापक वार्षिक देखभाल कराराची (AMC) एकूण किंमत ₹४६.८६ दशलक्ष (दोन्ही जीएसटी वगळून) आहे. या करारासह कंपनीने डिस्ट्रीब्युटेड पॉवर सप्लाय ट्रेन्सच्या प्रोपल्शन सिस्टीमच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.
संशोधन, डिझाइन आणि विकास केंद्र (R&D सेंटर)
फरीदाबाद, हरियाणा येथे असलेले कंपनीचे इन-हाउस संशोधन, डिझाइन आणि विकास केंद्र हे तिच्या कामकाजाचा तांत्रिक कणा आहे. हे केंद्र नवोपक्रम, अभियांत्रिकी आणि जटिल व उच्च-कार्यक्षमतेच्या पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर रेल्वे प्रणालींच्या प्रगतीसाठी समर्पित आहे. डिस्ट्रीब्युटेड पॉवर सप्लाय प्रोपल्शन उपकरणांच्या डिझाइन आणि विकासाची गरज भागवण्यासाठी कंपनीने नवीन R&D केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
विद्यमान R&D केंद्राला १२ जून २०२६ रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च विभागाने (DSIR) मान्यता दिली आहे.
रेल्वे उद्योगात वापरासाठी नवीन इलेक्ट्रिकल उपकरणे आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्स प्रणालींचे संशोधन, डिझाइन आणि विकासावर कंपनी लक्ष केंद्रित करत आहे. तांत्रिक क्षमता, स्वदेशी डिझाइन केलेली व विकसित केलेली प्रोपल्शन उपकरणे आणि इन-हाउस असेंबलिंग-सह-उत्पादन सुविधा असलेला देशांतर्गत निर्माता म्हणून धोरणात्मक भूमिका बजावण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
उत्पादन सुविधा (Manufacturing Facilities)
कंपनीची असेंबलिंग-सह-उत्पादन सुविधा गाव बघोला, पलवल, हरियाणा (युनिट १) येथे आहे. येथे फॅब्रिकेशन, असेंबलिंग आणि चाचणी सुविधांसह व्हेईकल कंट्रोल युनिट आणि कंट्रोल सिस्टीम्सच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षमतांसाठी हाय स्पीड SMT (सरफेस माऊंट टेक्नॉलॉजी) लाईन आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, कंपनीने नांगला भिकू, पलवल, हरियाणा येथे आपल्या प्रस्तावित युनिट २ साठी आवश्यक नियामक मंजुऱ्या मिळवल्या आहेत. हे युनिट १ मधील फॅब्रिकेशन प्रक्रिया आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षमतांसह समाकलित (integrated) उत्पादन मॉडेलवर कार्य करेल.
उत्पादने सुरक्षा आणि गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी कंपनीने उत्पादन आणि असेंब्ली प्रक्रियेदरम्यान गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया लागू केल्या आहेत.
ऑर्डर बुक (Order Book) : ३० जून २०२६ पर्यंत, कंपनीकडे भारतीय रेल्वेच्या चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स आणि पतियाळा लोकोमोटिव्ह वर्क्स या तिन्ही युनिट्सकडून ५६४ (पाचशे चौसष्ट) ३-फेझ प्रोपल्शन उपकरणांच्या पुरवठ्याची कार्यान्वित करण्यायोग्य (executable) थकीत ऑर्डर आहे. याची एकूण ऑर्डर किंमत ₹९,२१६.४० दशलक्ष (जीएसटी वगळून) आणि AMC किंमत ₹६७६.७८ दशलक्ष (जीएसटी वगळून) आहे.
याशिवाय, कंपनीकडे MEMU (ऑन बोर्ड - १२ कार रेक्स), कॉम्पोझिट कन्व्हर्टर आणि हॉटेल लोड कन्व्हर्टरसाठी मायक्रोप्रोसेसर नियंत्रित IGBT आधारित ३ फेझ प्रोपल्शन उपकरणांच्या विकासकामांठीच्या (developmental) ऑर्डर्स आहेत, ज्यांचे एकूण मूल्य ₹८९८.५७ दशलक्ष (जीएसटी वगळून) आणि AMC मूल्य ₹४८.६४ दशलक्ष (जीएसटी वगळून) आहे.
संडे कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत आणि केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. तर कंपनीचे इक्विटी शेअर्स एनएसई आणि बीएसईवर सूचीबद्ध (लिस्ट) करण्याचे प्रस्तावित आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी