अग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणी तातडीने पूर्ण करा- रायगड प्रशासन
रायगड, 27 जुलै (हिं.स.) :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी अग्रीस्टॅक (Agristack) फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ
No-loan-waiver-benefit-without


रायगड, 27 जुलै (हिं.स.) :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांसाठी अग्रीस्टॅक (Agristack) फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अलिबाग यांच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी २४ जुलै रोजी प्राप्त झाली असून, ती संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, संस्थांच्या सचिव कार्यालये तसेच बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे अग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्रात जाऊन तात्काळ नोंदणी करून घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेची माहिती जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रे, सीएससी केंद्रे आणि बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आधार प्रमाणीकरणाची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असून, कोणत्याही लाभार्थ्याकडून शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे या प्रक्रियेसाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग तनवीर पाटील यांनी केले आहे.

पात्र शेतकऱ्यांनी कोणताही विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande