संसदेच्या मकर द्वारावर विरोधकांचे आंदोलन; 20 जुलैच्या घटनेवर गृहमंत्र्यांकडून उत्तरदायित्वाची मागणी
नवी दिल्ली, 27 जुलै (हिं.स.)। संसदेच्या मकर द्वारावर सोमवारी सकाळी विरोधी पक्षांच्या खासदारांनी 20 जुलै रोजी जंतर-मंतर येथे सीजेपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उत्
OPPOSITION MPS PROTEST MAKAR DWAR HOME MINISTER


Leaders of the INDIA alliance held a meeting


नवी दिल्ली, 27 जुलै (हिं.स.)। संसदेच्या मकर द्वारावर सोमवारी सकाळी विरोधी पक्षांच्या खासदारांनी 20 जुलै रोजी जंतर-मंतर येथे सीजेपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईबाबत गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून उत्तरदायित्वाची मागणी करत आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केले. यावेळी खासदारांनी घोषणाबाजीही केली. विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित क्रूर कारवाईसाठी गृहमंत्री थेट जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि संसदेत हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यापूर्वी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात इंडी आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रमोद तिवारी, सय्यद नसीर हुसेन, के. सी. वेणुगोपाल, गौरव गोगोई, जयराम रमेश यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. बैठकीत संसदेच्या आत आणि बाहेर विद्यार्थ्यांचा मुद्दा सातत्याने उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

उल्लेखनीय आहे की, 20 जुलै रोजी सीजेपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी संसद मार्च काढला होता. यावेळी पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि कथितपणे पॅलेट गनचाही वापर केला. या चकमकीत 100 हून अधिक विद्यार्थी आणि अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर विरोधक सातत्याने विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ उभे राहिले असून सरकारवर दबाव आणत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande