राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : धावपटू गुरिंदरवीर सिंग १०० मीटर अंतिम फेरीसाठी अपात्र
ग्लासगो, 27 जुलै (हिं.स.)भारतीय धावपटू गुरिंदरवीर सिंग राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. प्राथमिक फेरीत (हीट्स) १०.३९ सेकंदांच्या निराशाजनक वेळेसह तो २८ व्या स्थानावर राहिला आणि पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीतून बाहेर पडला. लांब
गुरिंदरवीर सिंग


ग्लासगो, 27 जुलै (हिं.स.)भारतीय धावपटू गुरिंदरवीर सिंग राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. प्राथमिक फेरीत (हीट्स) १०.३९ सेकंदांच्या निराशाजनक वेळेसह तो २८ व्या स्थानावर राहिला आणि पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीतून बाहेर पडला. लांब उडीमध्ये एम. श्रीशंकर आणि लोकेश यांनी पात्रतेचा निकष पार करून अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीशंकरने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८.०१ मीटर फेक करून 'अ' गटात स्थान मिळवले. त्याची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ८.३८ मीटर आहे. अंतिम फेरीसाठी पात्रतेचा निकष आठ मीटर किंवा त्याहून अधिक असून, किमान १२ खेळाडूंनी ही कामगिरी करणे आवश्यक आहे.

१०० मीटर शर्यतीत गुरिंदरवीर आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळपासही पोहोचू शकला नाही आणि पहिल्याच फेरीत तो बाद झाला. चौथ्या हीटमध्ये गुरिंदरवीरने पाचव्या लेनमधून चांगली सुरुवात केली होती. सुरुवातीला त्याची जमैकाच्या रोहन वॉटसनसोबत बरोबरी झाली, पण जमैकाच्या खेळाडूने शेवटच्या ३०-३५ मीटरमध्ये वेग वाढवून १०.१३ सेकंदांची वेळ नोंदवत पहिले स्थान पटकावले.

भारतीय खेळाडू त्याच्या हीटमध्ये दुसऱ्या स्थानी राहिला, पण एकूण २८ व्या स्थानी राहिल्याने तो उपांत्य फेरीतून बाहेर पडला. वॉटसन एकूण नवव्या स्थानी राहिला आणि मंगळवारच्या उपांत्य फेरीत पोहोचला. बाय मिळाल्यामुळे सात खेळाडू आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते. त्याच्या हीटमधील १७ सर्वोत्तम कामगिरी करणारे खेळाडू उपांत्य फेरीत त्याच्यासोबत सामील झाले.

पंजाबच्या २५ वर्षीय गुरिंदरवीरने मे महिन्यात रांची येथे झालेल्या फेडरेशन कपमध्ये १०.०९ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. १०.१० सेकंदांपेक्षा कमी वेळ नोंदवणारा तो पहिला भारतीय आहे. पण, त्याला येथे या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.

भारतीय लांब उडीपटू एम. श्रीशंकरने आपल्या पहिल्याच प्रयत्नात पात्रतेचा निकष पार करून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीशंकरने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ८.०१ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत 'अ' गटातील अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. त्याची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ८.३८ मीटर आहे. सत्तावीस वर्षीय श्रीशंकरला २०२२ मध्ये झालेल्या मागील स्पर्धेतील रौप्य पदकाच्या कामगिरीत सुधारणा करण्याची आशा आहे. लोकेश सत्यनाथन हा या स्पर्धेत भाग घेणारा दुसरा भारतीय खेळाडू असून त्यानेही ७.७७ मीटरच्या उडीसह अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली आहे. लांब उडीची अंतिम फेरी २९ जुलै रोजी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande