मध्य रेल्वेकडून २४६ गणपती विशेष गाड्यांची घोषणा
मुंबई, २८ जुलै (हिं.स.) : मध्य रेल्वे द्वारे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे: • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाड्या – ९८ सेवा • लोकमान्य टि
रेल्वे गणपती विशेष गाड्या


मुंबई, २८ जुलै (हिं.स.) : मध्य रेल्वे द्वारे येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी २४६ गणपती विशेष गाड्या चालवणार आहे. यामध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे:

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाड्या – ९८ सेवा

• लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाड्या – ७६ सेवा

• पुणे येथून सुटणाऱ्या गाड्या – १० सेवा

• अनारक्षित विशेष गाड्या – ६२ सेवा

गणपती विशेष गाड्यांचा तपशील:

१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष गाडी (३२ सेवा)

विशेष गाडी क्रमांक 01103 दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २६.०९.२०२६ या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १५.३० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

विशेष गाडी क्रमांक 01104 दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून ०४.३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १६.४० वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

गाडीची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सावंतवाडी रोड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष गाडी (३४ सेवा)

विशेष गाडी क्रमांक 01151 दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.२० वाजता पोहोचेल. (१७ सेवा)

विशेष गाडी क्रमांक 01152 दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून १५.३५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता पोहोचेल. (१७ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

गाडीची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - रत्नागिरी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष गाडी (३२ सेवा)

विशेष गाडी क्रमांक 01153 दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २६.०९.२०२६ या कालावधीत दररोज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.३० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी २०.२५ वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

विशेष गाडी क्रमांक 01154 दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज रत्नागिरी येथून ०४.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

गाडीची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

४) लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष गाडी (३४ सेवा)

गाडी क्रमांक 01171 विशेष गाडी दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २१.०० वाजता पोहोचेल. (१७ सेवा)

गाडी क्रमांक 01172 विशेष गाडी दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज सावंतवाडी रोड येथून २२.३५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल. (१७ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

गाडीची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

५) लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस द्वि-साप्ताहिक चालवण्यात येणारी विशेष गाडी (८ सेवा)

गाडी क्रमांक 01131 विशेष गाडी दिनांक १७.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दर गुरुवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २२.१० वाजता पोहोचेल. (४ सेवा)

गाडी क्रमांक 01132 विशेष गाडी दिनांक १७.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दर गुरुवारी आणि रविवारी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. (४ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

गाडीची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

६) लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (४ सेवा)

गाडी क्रमांक 01129 विशेष गाडी दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०८.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी २२.१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

गाडी क्रमांक 01130 विशेष गाडी दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी दर मंगळवारी सावंतवाडी रोड येथून २३.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

डब्यांची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

७) लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी - लोकमान्य टिळक टर्मिनस (आठवड्यातून ५ दिवस) विशेष गाडी (२२ सेवा)

गाडी क्रमांक 01167 विशेष गाडी दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २६.०९.२०२६ या कालावधीत दर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २१.०० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०५.०० वाजता पोहोचेल. (११ सेवा)

गाडी क्रमांक 01168 विशेष गाडी दिनांक १३.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दर बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी येथून १५.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००.४० वाजता पोहोचेल. (११ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.

८) लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक वातानुकूलित विशेष गाडी (४ सेवा)

गाडी क्रमांक 01165 वातानुकूलित विशेष गाडी दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

गाडी क्रमांक 01166 वातानुकूलित विशेष गाडी दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी दर मंगळवारी मडगाव येथून १६.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे, थिवि आणि करमळी.

डब्यांची संरचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, ३ वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय,आणि २ जनरेटर व्हॅन्स.

९) लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी (४ सेवा)

गाडी क्रमांक 01185 विशेष दिनांक १६.०९.२०२६ आणि दिनांक २३.०९.२०२६ रोजी दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.४५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

गाडी क्रमांक 01186 विशेष दिनांक १६.०९.२०२६ आणि दिनांक २३.०९.२०२६ रोजी दर बुधवारी मडगाव येथून १६.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मदुरे (केवळ गाडी क्रमांक 01185 साठी), थिवि आणि करमळी.

डब्यांची संरचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, १ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

१०) पुणे - रत्नागिरी वातानुकूलित साप्ताहिक विशेष गाड्या (४ सेवा)

गाडी क्रमांक 01445 वातानुकूलित साप्ताहिक विशेष दर मंगळवार दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

गाडी क्रमांक 01446 वातानुकूलित साप्ताहिक विशेष दर मंगळवार दिनांक १५.०९.२०२६ आणि दिनांक २२.०९.२०२६ रोजी रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:२० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

गाडीची संरचना: ३ वातानुकूलित द्वितीय, १५ वातानुकूलित तृतीय, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

११) पुणे - रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाड्या (६ सेवा)

गाडी क्रमांक 01447 साप्ताहिक विशेष दर शनिवार दिनांक १२.०९.२०२६, दिनांक १९.०९.२०२६ आणि दिनांक २६.०९.२०२६ रोजी पुणे येथून ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. (३ सेवा)

गाडी क्रमांक 01448 साप्ताहिक विशेष दर शनिवार दिनांक १२.०९.२०२६, दिनांक १९.०९.२०२६ आणि दिनांक २६.०९.२०२६ रोजी रत्नागिरी येथून १७:५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५:२० वाजता पोहोचेल. (३ सेवा)

थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरावली रोड आणि संगमेश्वर रोड.

डब्यांची संरचना: २ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.

१२) दिवा – खेड – दिवा मेमू दैनंदिन अनारक्षित विशेष गाड्या (३२ सेवा)

(दिनांक २२.०९.२०२६ रोजी वगळून)

गाडी क्रमांक 01155 मेमू विशेष गाडी दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत (दिनांक २२.०९.२०२६ रोजी वगळून) दिवा येथून ०७.१५ वाजता सुटेल आणि खेड येथे त्याच दिवशी १४.३५ वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

गाडी क्रमांक 01156 मेमू विशेष गाडी दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत (दिनांक २२.०९.२०२६ रोजी वगळून) खेड येथून १६.०० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी २२.५० वाजता पोहोचेल. (१६ सेवा)

थांबे: निळजे, तळोजा पंचनद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी आणि कळंबणी बुद्रुक.

डब्यांची संरचना: १२ डब्यांची मेमू रॅक.

१३) दिवा – चिपळूण – दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष गाड्या (३० सेवा)

(दिनांक २३.०९.२०२६ /दिनांक २४.०९.२०२६ रोजी वगळून)

गाडी क्रमांक 01133 मेमू विशेष गाडी दिनांक ११.०९.२०२६ ते दिनांक २७.०९.२०२६ या कालावधीत दररोज (दिनांक २३.०९.२०२६ रोजी वगळून) दिवा येथून १३.४० वाजता सुटेल आणि चिपळूण येथे त्याच दिवशी २१.३० वाजता पोहोचेल. (१५ सेवा)

गाडी क्रमांक 01134 मेमू विशेष गाडी दिनांक १२.०९.२०२६ ते दिनांक २८.०९.२०२६ या कालावधीत दररोज (दिनांक २४.०९.२०२६ रोजी वगळून)चिपळूण येथून ०७.३० वाजता सुटेल आणि दिवा येथे त्याच दिवशी १३.०० वाजता पोहोचेल. (१५ सेवा)

थांबे: निळजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजणी.

डब्यांची संरचना: 12 कार मेमू रेक

आरक्षण : गणपती विशेष आरक्षित गाड्यांसाठीचे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) खालीलप्रमाणे सुरू होईल: -

दिनांक ०१.०८.२०२६ रोजी गाडी क्रमांक 01153, 01445, 01167 आणि 01447 साठी

दिनांक ०२.०८.२०२६ रोजी गाडी क्रमांक 01165 आणि 01185 साठी;

दिनांक ०३.०८.२०२८ रोजी गाडी क्रमांक 01103, 01129, 01151, 01171 आणि 01131 साठी.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande