अमरावती - बेनोडा येथील शहीद स्मारकाची दुरवस्था; ग्रामस्थ संतप्त
अमरावती, 28 जुलै (हिं.स.) स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या ११ हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या बेनोडा शहीद येथील शहीद स्मारकाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. स्मारक परिसरात सर्वत्र घाण, वाढलेले गवत आणि दुर्गंधी पसरल्याने ग्
बेनोडा येथील शहीद स्मारकाची दुरवस्था स्मारक परिसरात घाणीचे साम्राज्य, देखभालीअभावी ग्रामस्थांचा संतप्त सवाल


अमरावती, 28 जुलै (हिं.स.) स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या ११ हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या बेनोडा शहीद येथील शहीद स्मारकाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. स्मारक परिसरात सर्वत्र घाण, वाढलेले गवत आणि दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थ व देशप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत स्मारकाच्या दुरवस्थेला जबाबदार कोण?, असा सवाल उपस्थित केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी १५ ऑगस्ट १९४२ रोजी बेनोडा शहीद येथे झालेल्या सत्याग्रह आंदोलनात बेनोडा, लोणी, इत्तमगाव, बेलोरा व परिसरातील एकूण ११ स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी वरुड-अमरावती मार्गालगत बेनोडा येथे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहीद स्मारक उभारण्यात आले.

स्मारकासाठी शासनाने लाखो रुपये खर्च केले असले तरी देखभालीअभावी त्याची अवस्था बिकट झाली आहे. स्मारकात किचन हॉल, बेडरूम, प्रशस्त आवार, सुमारे दोन हजार चौरस फूट मोकळी जागा, वीज व पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र सध्या वीज व पाणीपुरवठा बंद असून स्मारकाच्या रंगरंगोटीला अनेक वर्षे लोटली आहेत. मुख्य प्रवेशद्वार कायम कुलूपबंद असून परिसरात कचरा, वाढलेले गवत आणि झुडुपांचे साम्राज्य पसरले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवस-रात्र स्मारक परिसरात काही समाजकंटकांकडून मद्यपान केले जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. त्यामुळे शहिदांच्या स्मृतींचा अवमान होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले असून स्मारकाची तातडीने दुरुस्ती, स्वच्छता व नियमित देखभाल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande