

नवी दिल्ली, ३१ जुलै (हिं.स.) : भारताच्या २३ वर्षीय ज्युदोपटू अस्मिता डे हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. महिला ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ज्युदोपटू अस्मिताने अत्यंत चुरशीची लढत दिली आणि सामना गोल्डन स्कोअरमध्ये गेला. अस्मिता डे हिच्यानंतर हर्ष सिंगने भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युदोत दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात वाझा-आरी सामन्यात हर्ष सिंगने ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्झला (१०-०) हरवून या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आणि इतिहासातील भारताचे दुसरे ज्युडो सुवर्णपदक जिंकले.
हर्ष सिंग, अस्मिता डे आणि यामिनी मौर्य यांनी आपापल्या गटात अंतिम फेरीत प्रवेश पक्का करून भारतासाठी पदक निश्चित केले. अस्मितासमोर महिलांच्या ४८ किलो गटात कॅनडाच्या हेडी क्वाचचे आव्हान होते. पहिल्या बाऊटमध्ये कॅनडाच्या खेळाडूने सुरुवातीचा एक गुण मिळवला आणि त्याची बरोबरी करण्यासाठी अस्मिताने जोर लावला. तिला पिवळे कार्ड दाखवून ताकीद दिली गेली, परंतु अस्मिताने पुनरागमन करताना बरोबरीचा गुण मिळवला. दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. दरम्यान, अस्मिताचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी स्टेडियममध्ये भारत माता की जयचा जयघोष झाला. बरोबरीची कोंडी न सुटल्याने सामना गोल्डन स्कोअरमध्ये गेला. यात जो खेळाडू पहिला गुण मिळवतो, त्याला विजयी घोषित केले जाते आणि अस्मिताने २५ सेकंदात तो गुण मिळवून सुवर्णपदक नावावर केले.
कॅट्झने आक्रमक सुरुवात केली, पण हर्षने उत्तम बचाव करत सुरुवातीचा फायदा हातातून निसटू दिला नाही. तो संधी साधत राहिला, पण लवकरच कॅट्झने त्याला जवळजवळ चितपट केले होते, मात्र भारतीय खेळाडूने त्यातून सुटका करून घेतली आणि कॅट्झला चितपट करण्याचा प्रयत्न केला, पण दोघांनाही गुण मिळाले नाहीत. दोघेही गुण मिळवू शकले नाहीत आणि घड्याळात शेवटचे मिनिट शिल्लक असताना ३:१९ मिनिटांवर हर्षला विजयाची संधी मिळाली आणि त्याने प्रतिस्पर्ध्याला चितपट करून वाझा-आरी (१० गुणांचा अर्धा इप्पॉन) मिळवला.
पुरुषांच्या ६० किलो गटाचा अंतिम सामना हर्ष सिंग विरुद्ध जोशुआ कॅट्झ (ऑस्ट्रेलिया) असा झाला. हर्षने उपांत्य फेरीत वाझा-अरी (१०-०) विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या पेड्रो कार्लोस अँटुन नेटोविरुद्ध वर्चस्वपूर्ण सुरुवात केली आणि मध्यंतरी एक थ्रो करून १० गुण, म्हणजेच वाझा-अरी मिळवले, जे सामना जिंकण्यासाठी पुरेसे होते. हर्ष हा भारतीय लष्कराचा जवान असून तो सैन्याच्या 'आर्मी ज्युडो नोड' चा खेळाडू आहे. हर्षने फायनलमध्येही वाझा-अरी (१०-०) ने विजय मिळवला.
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी