ई-20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होऊ शकते - गडकरी
- इंजिनमध्ये कोणत्याही बदलांची आवश्यकता नाही नवी दिल्ली, 31 जुलै (हिं.स.) - ई-20 (इथेनाॅल) मिश्रित पेट्रोल वापरल्याने वाहनांचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आहे.
गडकरी


- इंजिनमध्ये कोणत्याही बदलांची आवश्यकता नाही

नवी दिल्ली, 31 जुलै (हिं.स.) - ई-20 (इथेनाॅल) मिश्रित पेट्रोल वापरल्याने वाहनांचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली आहे. गडकरी यांनी पुढे म्हटले की, ई-20 मुळे काही जुन्या बीएस-3 वाहनांमधील विशिष्ट रबरचे भाग आणि गॅस्केट बदलण्याची आवश्यकता भासू शकते. भारत स्टेज (BS-III) वाहने प्रामुख्याने 2005 ते 2016 दरम्यान तयार करण्यात आली होती. हे भाग नियमित सर्व्हिसिंग दरम्यान सहजपणे बदलता येतात. अभ्यासात असे आढळून आले आहे की, ई-20 मुळे वाहनांच्या एकूण कार्यक्षमतेवर किंवा टिकाऊपणावर कोणताही मोठा परिणाम होत नाही. या वाहनांच्या इंजिनमध्ये कोणत्याही बदलांची आवश्यकता नाही, असेही गडकरींनी स्पष्ट केले.

गडकरी यांनी स्पष्ट केले की, इंडियन ऑइल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी ई-20 इंधनावर एक अभ्यास केला होता. वाहनाचे मायलेज केवळ इंधनावर अवलंबून नसते, तर त्यावर ड्रायव्हिंगची शैली, रस्त्याची स्थिती, देखभाल आणि इतर घटकांचाही प्रभाव पडतो. याचा वापर जगभरात शंभर वर्षांहून अधिक काळापासून केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande