
अकोला, 14 ऑगस्ट (हिं.स.)।
गणेश मूर्ती विसर्जनाबाबत न्यायालयाने यंदाही दिलासा दिला आहे. गेल्या वर्षी 2025 प्रमाणेच यंदाही 1 ते 6 फुटांच्या POP मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्तोतात करता येणार आहे.
न्यायालयाने आज सुनावणीनंतर निकाल राखून ठेवताना हा महत्त्वाचा निर्णय दिला. त्यामुळे गणेश भक्त, मूर्तिकार, कामगार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आमदार सावरकर, खासदार धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश
या निर्णयासाठी आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अकोला शहर आणि जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त मंडळे मोठ्या मूर्ती बसवतात. देवीच्या मूर्तीही बसतात. त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आमदार सावरकरांनी केले.
सरकार आणि समितीचे आभार
या लढ्यासाठी अखिल सार्वजनिक उत्सव समिती महाराष्ट्र राज्य गेली अनेक वर्षे न्यायालयात लढत आहे. समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांनी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार रणधीर सावरकर आणि खासदार अनुप धोत्रे यांचे मनापासून आभार मानले.
अखिल गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, कार्याध्यक्ष सुहास आडिवरेकर, सरचिटणीस सुरेश सरनौबत यांनी देखील या चौघांचे आभार मानले.
100 वर्षांची परंपरा अबाधित
सिद्धार्थ शर्मा, पवन महल्ले, संतोष पांडे, गिरीश जोशी, अॅड. विनोद सिंग ठाकूर, अॅड. सुभाष सिंग ठाकूर, वैभव पाटील, सुरेश गांधी, अॅड. खत्री, सुरेश मिश्रा, शरद चांडक, गिरीराज राठी, अॅड. गिरीश गोखले, केशव हेडा, वसंत संदलकर, मनीष बाछुका, प्रा. अनुप शर्मा, करण शाहू, संदीप गावंडे, विनोद मनवानी, हिराल कुपलानी, हरीश अलीमचंदानी, कन्हैया आहुजा, रणजीत खेडकर, राहुल घोणे यांच्यासह सर्व मूर्तिकार व मंडळांनी आनंद व्यक्त केला.
पर्यावरणाचा समतोल आणि 100 वर्षांची परंपरा दोन्हीचा विचार करून सरकार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यामुळेच हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास गणेश भक्तांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे