ठाणे - मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात 'स्वातंत्र्य दिन' उत्साहात साजरा
ठाणे, 15 ऑगस्ट (हिं.स.)। भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे कार्यालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राधिकरणाच्या सचिव कल्पना जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्या
Thane


ठाणे, 15 ऑगस्ट (हिं.स.)। भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे कार्यालयात देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राधिकरणाच्या सचिव कल्पना जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच प्राधिकरण परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. राष्ट्रध्वजारोहणानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना संबोधित करताना सचिव कल्पना जगताप यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशाच्या प्रगतीमध्ये प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी वित्त नियंत्रक कांचन तावडे, उपमुख्य अभियंता राजकुमार पवार, सक्षम प्राधिकारी अश्विनी सुर्वे-पाटील, सक्षम प्राधिकारी मीनल पालांडे, कार्यकारी अभियंता सलीम सय्यद, मुख्य विधी सल्लागार ॲड. सुमन प्रसाद, कार्यालयीन अधीक्षक शिल्पा नातू, सहाय्यक निबंधक रोहिदास बांगर, सहकार अधिकारी दीपाली भाले, लेखा अधिकारी शिरीष पालव, मिळकत व्यवस्थापक जनार्दन भोयबार,उपजिल्हाधिकारी विजयकुमार वाकोडे,(सेवा.नि.) यांच्यासह प्राधिकरणातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande