
बीड, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते सकाळी ९.०५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis